किल्लारी : प्रजासत्ताक दिनीच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची किल्लारी शाखा अज्ञात चोरट्यांनी बुधवारी ( ता. २६ ) पहाटे फोडल्याचे ध्वजारोहणासाठी आलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
आठ दिवसांपूर्वीच किल्लारी पोलिस स्टेशनच्या वतीने किल्लारी व पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच सरकारी व सहकारी बँकांना भेटी देऊन या थंडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असतात. त्याअनुषंगाने आपापल्या शाखेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे व वॉचमनची व्यवस्था करावी, काही अनुचित प्रकार घडल्यास घटनेची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावी. अशी विनंती किल्लारी पोलिसांनी केली होती. असे असले तरी येथील डीसीसी बँकेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
प्रजासत्ताक दिनीच पहाटे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान येथील शाखेचे शटर तोडून मोठा गॅस सिलेंडर आत मध्ये घेऊन जाऊन दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शटरचे कुलूप तोडून लाॕकर रुमच्या दरवाज्याचे कडी कोंडा गॅस वेल्डिंगच्या साह्याने कट करून अज्ञात चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. जागोजागी असलेली सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकले आहे. गॅस कटरच्या साह्याने तिजोरीला झाळून कट करून तिजोरीतील रक्कम लंपास केल्याची घटना सकाळी ध्वजा वंदनसाठी आलेल्या किल्लारी शाखा व्यवस्थापक पी आर कुलकर्णी, एम.जी. मोरे, सेवक सरवणे, वॉचमन घोडके या बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे.
यावेळी तात्काळ घटनेची माहिती किल्लारी पोलिसांना देण्यात आली. किल्लारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रंणजीत काथवटे, बीट जमादार गौतम भोळे, बाबासाहेब इंगळे, बीट जमादार सचिन उस्तुर्गे, बीट जमादार गणेश यादव, पोलीस हेडकॉन्स्टेबल साळुंखे, गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून एपिआय गायकवाड यांनी फिंगरप्रिंट व डॉग स्कॉड ला पाचारण केले आहे. या चोरीच्या घटनेमध्ये वाहनासह दोन पेक्षा अधिक व्यक्ती समाविष्ट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पहाटे 02:28 ला माझ्या मोबाईलवर अलार्म वाजला आहे. मात्र मोबाईल सायलेंट असल्याने मला ते जाणवले नाही.
शाखा व्यवस्थापक पी. आर. कुलकर्णी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा किल्लारी.
डीसीसी बँक चोरीच्या घटनेमध्ये बारा लाख रुपये चोरीले गेलेले आहेत. वरिष्ठांना याची माहिती दिली असून अधिक तपास करीत आहोत. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-सुनील गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन किल्लारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.