Maratha Community Reservation : किल्लेधारूर शहर दिवसभर कडकडीत बंद; सकल मराठा समाज कडून प्रशासनाला निवेदन

Maratha Community Reservation : किल्लेधारूर शहरात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कडक बंद ठेवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने सकल मराठा समाजाने जिल्हा बंदचे आवाहन केले.
killedharur, Maratha Community Reservation
killedharur, Maratha Community Reservationsakal
Updated on

जि. बीड (किल्लेधारूर) : ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगे पाटील सहाव्यंदा उपोषणाला बसले आहेत.उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून प्रशासन लक्ष देत नसल्याने सकल मराठा समाज बीड च्या वतीने जिल्हा बंद चे आव्हान ता.२१ रोजी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत धारूर येथील व्यापारी बांधवांनी शहरातील सर्व स्थापना बंद ठेऊन बंद ला प्रतिसाद दिला शहर कडेकोट बंद होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत मनोज जरांगे पाटील हे ता.१७ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सहाव्यंदा आमरण उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाच दिवस झाले असून उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे मात्र सरकार लक्ष देत नसल्याने सकल मराठा समाज बीड जिल्हा च्या वतीने ता.२१ बंद चे आवाहन केले होते या दृष्टीने ता.२० रोजी किल्लेधारूर सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला ता. २१ बंद चे निवेदन दिले होते स्थानिक व्यापारी बांधवांनी आस्थापना बंद ठेऊन प्रतिसाद दिला.सकल मराठा समाज किल्लेधारूर च्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.