Kinwat Assembly Election : आजी माजी आमदारांचे मतदार संघाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष; पारंपारिक प्रतिस्पर्धीमध्ये रंगणार निवडणूकीचा फड

किनवट विधानसभा मतदारसंघ विकासाच्या अनुषेशापासून कोसो दुर आहे. मतदारसंघात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू आहे.
Kinwat Assembly Election 2024 candidate
Kinwat Assembly Election 2024 candidatesakal
Updated on

- स्वप्नील भालेराव / मिलिंद सर्पे

किनवट - विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात चांगली रंगत आली आहे. एकुण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भिमराव केराम, व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यातच खरी लढत होणार आहे. अपक्ष उमेदवार सचिन नाईक व वंचित बहुजन आघाडीचे डॉ. पुंडलिक आमले हे कोणाचे मत विभाजन करतील यावरचं महाविकास आघाडीचा की, महायुतीचा उमेदवार विजयी ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.