Phulambri News : शेतकऱ्याकडे पैशाची मागणी...शासनाने तुम्हाला दलाल म्हणून नेमले का ? किशोर बलांडे आक्रमक

Phulambri Latest News In Marathi : फुलंब्री पंचायत समितीत माजी सभापती किशोर बलांडे आक्रमक : शेतकऱ्यांना रोहयोचे पैसे मिळेना..!
kishor balande over demand for money from farmers to get done work of irrigation and other schemes
kishor balande over demand for money from farmers to get done work of irrigation and other schemesSakal
Updated on

फुलंब्री : रोजगार हमी योजनेत शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी व गायगोठे मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी होते. तसेच काम पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांचे गाय गोठे व विहिरीचे कुशल बील ऑनलाईन करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्याकडे पैशाची मागणी होते. शासनाने तुम्हाला पैसे जमा करायला दलाल म्हणून नेमले का..?

येत्या सात दिवसात शेतकऱ्यांचे बिले ऑनलाईन न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जना आंदोलन उभारणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी अधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.१८) दिला आहे.

फुलंब्री तालुक्यात सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना गाय गोठे व सिंचन विहीर मंजूर झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे यात गाय गोठ्याचे काम पूर्ण झाले असून सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला गाय गोठे व सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडून पैसे उकळले.

त्यानंतर आता पुन्हा सदरील बिले ऑनलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांकडे वारंवार पैशाची मागणी केली जात आहे. दहा - दहा, वीस - वीस हजार रुपये घेऊनही शेतकऱ्यांची बिले ऑनलाईन केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्याकडे गाय गोठे व सिंचन विहीरीच्या कुशल कामाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली.

त्यामुळे माजी सभापती किशोर बलांडे यांनी पंचायत समितीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांची थकलेली कुशल कामाची बिले तात्काळ एम बी करून ऑनलाईन करावे, शेतकऱ्याकडून पैसे उकळण्यासाठी तुम्हाला शासनाने दलाल म्हणून नेमले का..?

असा खोचक प्रश्न रोजगार हमी योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केला. येत्या सात-आठ दिवसात शेतकऱ्यांची बिले एमबी करून ऑनलाईन न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सभापती किशोर बलांडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला आहे.

१३ कोटीची बिले ऑनलाईन नाही

फुलंब्री तालुक्यात सुमारे अकराशे शेतकऱ्यांनी गाय गोठेचे काम पूर्ण केले आहे. तसेच सुमारे सातशे विहिरींचे काम पूर्ण झाले असून त्यांचे कुशल बिल अजूनही ऑनलाईन झाले नाही. हे कामे करण्यासाठी रोजगार हमी योजना विभागातील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्याने माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी आक्रमक होऊन पंचायत समिती दणानुन सोडली.

रोजगार हमी योजनेतील अभियंता, एपीओ, ऑपरेटर शेतकऱ्यांकडे सातत्याने पैशाची मागणी करतात. मंजुरीसाठी शेतकरी पैसे देतात, त्यानंतर बिले ऑनलाईन करण्यासाठी शेतकऱ्याकडून पैसे उकळले जाते. पैसे देऊ नये वेळेवर काम होत नाही अशी तक्रार शेतकरी करत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सदरील बिले ऑनलाईन न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपोषण करणार आहे.

- किशोर बलांडे, माजी सभापती, अर्थ व बांधकाम जि.प. संभाजीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.