श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शन

file photo
file photo
Updated on

नांदेड :- श्रीक्षेत्र माळेगाव येथे भव्य व अत्याधुनिक कृषि प्रदर्शन भरविण्यासाठी सर्व उत्पादक कंपनी व त्यांचे प्रतिनिधी यांनी सहकार्य करुन प्रदर्शनात सहभाग नोंदवावा व शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले तंत्रज्ञान प्रात्याक्षिकाच्या माध्यमातुन शेतकऱ्याना उपलब्ध करुन दयावे व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी यांनी केले आहे.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी  सभापती रेड्डी दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, सुधारित कृषि औजारे इत्यादी कंपन्याच्या प्रतिनिधीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.

शेतकऱ्यांचे मातीचे नमुने विना शुल्क तपासण्यात येणार 

या बैठकीत अत्याधुनिक कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी चर्चा करण्यात आली. प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध कृषि योजनांची, सुधारित कृषि तंत्रज्ञानाची, ठिबक व तुषार सिंचन संचाची माहिती देण्यात येणार आहे. सेंद्रीय शेती, ॲग्रो टुरिझम याविषयी माहिती देण्यात येणार आहे. कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी व सगरोळी मार्फत माती परिक्षण फिरती प्रयोग शाळेद्वारे शेतकऱ्यांचे मातीचे नमुने तपासण्यात येणार आहेत. राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टीलायझर्स या कंपनी मार्फत शेतकऱ्यांचे मातीचे नमुने विना शुल्क तपासण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना विविध पिकाच्या लागवडी संबंधी कृषि विषयातील तज्ञ व्यक्तीकडुन माहिती देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात विविध ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारांच्या कंपनी मार्फत स्टॉल लावण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्याव्दारे माहिती देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्याकडे पशुधन ठेवले पाहिजे

जि. प. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भरविण्यात येणाऱ्या कृषि प्रदर्शनाला मोठया प्रमाणात शेतकरी भेट देत असतात. त्याअनुषंगाने विविध कंपनी प्रतिनिधी यांनी सेंद्रीय शेती, पाणी व्यवस्थापन, खताचा वापर, आधुनिक पण कमी खर्चाची शेती औजारे वापरुन कमी मजूरात शेती कशी करता येईल याबाबत स्टॉल उभे करुन शेतकऱ्यांना शेती बरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करावे तसेच शेतकऱ्याकडे दररोज पैसा आला पाहिजे अशा पध्दतीने शेती करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी आपल्याकडे पशुधन ठेवले पाहिजे असे सांगितले.

या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना किटकनाशक औषधी तसेच सुरक्षाकीट वापराबाबत प्रात्यक्षीक व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्यादृष्टीने एसएसवायमार्फत माहिती देण्यात यावी अशा सुचना दिल्या. या प्रदर्शनात फळे, भाजीपाला व मसाला पिके याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रत्येक नमुन्यातून तीन बक्षीसे देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस 4 हजार, द्वितीय बक्षीस 3 हजार व तृतीय बक्षीस 2 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

खते, बियाणे, किटकनाशक औषधीचे स्टॉल

या कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी जिल्हा परिषदमार्फत देण्यात येणारे कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून पंचायत समिती मार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.  जिल्हा सिडस्, फर्टीलायझर्स अशोसिएशन अध्यक्ष मधुकर मामडे यांनी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील कृषि प्रदर्शनात मोठया प्रमाणात  खते, बियाणे, किटकनाशक औषधीचे स्टॉल उभारुन शेतकऱ्यांना कंपनी प्रतिनिधी मार्गदर्शन करतील असे सांगितले.

कृषि निविष्ठा उत्पादकांनी जास्तीतजास्त प्रमाणात स्टॉल उभारुन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी व जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी केले. जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिके यांचे उत्कृष्ट नमुने दि.28 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आपले तालुक्याचे कृषि अधिकारी / कृषि सहाय्यक यांचे प्रमाणपत्रासह आणणेबाबत आवाहन मोहिम अधिकारी गजानन हुंडेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.