Latur : बिदर, अदिलाबादहून पंढरपूरला जादा रेल्वे

कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांची सोय
रेल्वे
रेल्वेsakal
Updated on

लातूर : कार्तिक एकादशीनिमित्त महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक विठ्ठल-रुक्माईच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने बिदर-पंढरपूर व अदिलाबाद-पंढरपूर या दोन जादा गाड्या सुरू होत आहेत. त्यामुळे बिदर, अदिलाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी भागांतील भाविकांची सोय झाली आहे.

बिदर - लातूर ही रेल्वे बिदरहून तीन व चार नोव्हेंबरला रात्री साडेदहाला सुटेल. रात्री १.३५ ला ती लातूरला येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सातला पंढरपूरला पोचेल. सकाळी साडेसातला तिचा परतीचा प्रवास सुरू होईल. लातूरला ती दुपारी बाराला येईल. दुपारी साडेतीनला बिदरला पोचेल. दोन दिवस ही रेल्वे धावणार आहे.

अदिलाबाद - पंढरपूर ही जादा रेल्वे तीन नोव्हेंबरला दुपारी दोनला अदिलाबादहूनहून निघेल. लातूरला रात्री २.४० ला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठला पंढरपूरला पोचेल. पंढरपूरहून सकाळी पावणेअकराला निघून लातूरला दुपारी ३.०५ ला पोचेल. तसेच सात नोव्हेंबरला सायंकाळी ६.३५ ला ही रेल्वे नांदेड येथून सुटणार आहे. रात्री २.४० ला लातूरला येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आठला पंढरपूरला पोचेल. याच दिवशी रात्री आठला ही रेल्वे पंढरपूरवरून निघेल. मध्यरात्रीनंतर १.२० ला लातूरला पोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.