लोकसभेचे कल आता समोर येत आहेत. यावेळी लातूरमध्ये पॅटर्न बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभेच्या लातूर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा ६१ हजार ८८१ मताधिक्य घेत पराभव केला आहे.
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले होते.
पण, या निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी ही जागा पुन्हा खेचून आणली आहे.
शिवाजीराव काळगे - ६,०९,०२१
सुधारप श्रृगांरे - ५,४८,१४०
विजयी उमेदवाराचे मताधिक्य- ६१,८८१
काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये या वेळी चुरशीची लढत पहायला मिळली. लातूर लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या या निवडणुकीत काँग्रेस आपला गड परत मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. भाजपचे सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती.
लातूर मतदारसंघ राखीव अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसने लिंगायत मतांचा विचार करून डॉ. शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली होती. लिंगायत समाजाचे नेतृत्त्व करणारा नेता किंवा खासदार दिल्याने काँग्रेसने ही निवडणुक चुरशीची बनवली होती. दरम्यान या ठिकाणी वंचितने देखील आपला उमेदवार देत निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणला.
लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, निलंगा व लोहा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
लातूर शहर - अमित देशमुख (काँग्रेस), लातूर ग्रामीण - धीरज देशमुख (काँग्रेस), अहमदपूर - संजय बनसोडे (राष्ट्रवादी, उदगीर - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी), निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर (भाजप), लोहा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष).
त्यापैकी लातूर शहर व ग्रामीण काँग्रेस, लोहा अपक्ष, निलंगा भाजप, अहमदपूर व उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या मतदारसंघामध्ये जास्त आमदार हे महायुतीचे आहेत, तर मविआचे म्हणजेच काँग्रेसचे २ आमदार आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघात ६२.४१ इतके मतदान झालं. उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम व मतदान केंद्रावरती प्राथमिक उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. लातूर लोकसभा मतदारसंघात १९ लाख ७७ हजार ५५ इतकी मतदार संख्या आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ- ६०.०२%
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ- ५९.७३ %
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - ६१.८९%
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ - ५७.३०%
निलंगा विधानसभा मतदारसंघ - ६०.५०%
उदगीर विधानसभा मतदारसंघ - ६१.५०%
२०१९ च्या तुलनेत यावर्षी उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाचा टक्का लातूर लोकसभा मतदारसंघात घसरल्याचे दिसून येत आहे. २०१९ साली ६३% मतदानाची नोंद झालेली होती.
सुधाकर शृंगारे (भाजप) विजयी मते : ६,६१,४९५
मच्छिंद्र कामत (काँग्रेस) मते : ३,७२,३८४
राम गारकर (वंचित बहुजन आघाडी) मते : १,१२,२५५
नोटा मते : ६,५६४
२००४ : भाजप
२००९ : काँग्रेस
२०१४ : भाजप
२०१९ : भाजप
लातूरमधील मतदारांसमोर कित्येक प्रश्न आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये रेल्वे कोच कारखाना, पीटलाईन, रस्ते, कचराप्रश्न, लातूरच्या पाण्याचा प्रश्न, उद्योग, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा भाव, रस्त्याच्या दुरवस्था, कृषी, सिंचन, सौरउर्जा, शेतकरी आत्महत्या, विकासकामे, मोठमोठ्या सभेमध्ये विकासाबाबत न बोलता विरोधी पक्षांवर केलेली टीका हे मुद्दे मतदानावर प्रभाव टाकू शकतील.
त्याचबरोबर मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना रशियन कंपनीला विकला गेल्याचा आरोप, मतदारसंघाचा रखडलेला औद्योगिक विकास, उजनी धरणातून पाणी पुरवठ्याचा प्रश्न, जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग, निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दाही प्रभावी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.