Latest Natur News: तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवर वाहनधारकांकडून महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक अमोल खैरनार यासह अन्य एका खासगी व्यक्तीला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२५) रात्री रंगेहाथ पकडले. त्याच्या कार्यालयाच्या झाडाझडतीतून ६३ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने आरटीओ अधिकाऱ्यासह अन्य एकाला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महाराष्ट्र आणि तेलगंणा राज्याच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आरटीओ विभागाचे चेक पोस्ट कार्यान्वित आहे. दररोज शेकडोच्या संख्येने वाहनांची रेलचेल असते. महाराष्ट्र आणि तेलगंणा राज्यातून ट्रकची ये-जा मोठ्या प्रमाणात असते.