Udgir : शहरातील जयहिंद पब्लिक स्कूल कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या दुसरीतील सातवर्षीय मुलीचा बुधवारी (ता. चार) पहाटे संशयास्पद मृत्यू झाला. अंकिता नागोराव माहोरे असे या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व अधीक्षिका या दोघांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
जय हिंद स्कूलमध्ये शिकणाऱ्या अंकिता नागोराव माहोरे ( रा. नरवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हिला झोपेतून उठवण्यासाठी गेले, तेव्हा ती कोमात असल्याचे लक्षात आले. तिला उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेव्हा तपासून तिला मृत घोषित करण्यात आले.