लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११७ उमेदवारी अर्ज, भाजपही मैदानात

निवडणुकीसाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या ३४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
Latur District Cooperative Bank
Latur District Cooperative Bankesakal
Updated on

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Latur District Cooperative Bank) पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या निवडणुकीत भाजपही मैदानात उतरला. जिल्हा बँकेच्या १९ जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या करिता सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणुकीसाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Dilip Deshmukh), पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या ३४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आमदार धीरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे, बँकेचे संचालक अशोक पाटील निलंगेकर, शिवसेनेचे संतोष सोमवंशी उपस्थित होते. या पॅनलच्या वतीने आमदार धीरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव काकडे, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यासह ३४ जणांनी (Latur) उमेदवारी अर्ज दाखल केले.

Latur District Cooperative Bank
राजन शिंदेंचा खून अल्पवयीन मुलानेच केला, आठ दिवस चालला तपास

या बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षही मैदानात उतरला आहे. माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. या पक्षाच्या वतीने देखील २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आजचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होती. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे काम पाहत आहेत.

उद्या होणार छाननी

या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दोनही बाजूने एकमेकांचे उमेदवार कसे बाद करता येतील या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत. कोणत्या उमेदवारांचे अर्ज बाद होणार याकडे आता लक्ष लागले आहे. ता. २१ ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.