औसा : विदर्भानंतर औसा (Ausa) तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या (farmers suicide) झालेल्या आहेत. या आत्महत्या आर्थीक विवंचनेतून झाल्या आहेत. औसा तालुक्यावर लागलेला हा मोठा डाग आहे. औसा मतदारसंघात फळबाग लागवडीसाठी मनरेगातून निधी उपलब्ध करुन देत येथील शेतकऱ्यांना आर्थीक सुबत्ता प्राप्त करुन देऊन त्यांच्या आडचणी सोडविणे हेच माझे राजकारणाचे ध्येय असुन मराठवाड्यातील ( Marathwada) सर्वात जास्त आत्महत्या केलेला हा तालुका फळबाग लागवडीत राज्याला आणि देशाला दिशा देणारा ठरेल.
नुसती फळबाग लावड नाही तर त्यावर प्रक्रिया उद्योगाचीही उभारणी केली जाणार आहे. मनरेगाच्या उत्कृष्ट कामात देशात व राज्यात औसा हा पहिल्या क्रमांकावर येत असुन जो पर्यंत शेतकरी आर्थीकदृष्ट्या मजबुत होणार नाही तो पर्यंत मी शेतकऱ्यांचा बांध सोडणार नसल्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. ते रविवारी औसा मतदारसंघातील १२० शेतकऱी व कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना औशात बोलत होते. ते स्वःता या शेतकऱ्यां सोबत जळगाव येथे तीन दिवशीय अभ्यास दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांचा समावेश आहे.यावेळी बोलतांना आमदार श्री. पवार यांनी सांगितले की, औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मतदारसंघ गाव मानून कामाला सुरुवात केली. पाणी वीज आणि रस्ता ही शेतकऱ्याच्या उन्नतीची त्रिसूत्री आहे. यापैकी शेतरस्ते या शेतकऱ्यांच्या धमन्या असल्याने आजपर्यंत ६४० किलोमीटर लांबीचे रस्ते तयार आहेत. आणखीन १२०० किमीचे रस्ते होणार आहेत.
अवर्षण आणि दुष्काळामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला असतांना या वातावरणात केशर आंबा आणि सीताफळ हे दोन फळझाडे चांगले येऊ शकतात हे ध्यानात आल्याने तालुक्यात याची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे त्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित केला असून या दौऱ्यात प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनी गावातील लोकांना शिकवावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी आधीकारी दत्तात्रय गावसाने, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता, सुहास पाचपुते, संजय कुलकर्णी, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.