उदगीरच्या शेख अबू सुलेमानने हात फ्रॅक्चर झाल्यानंतरही मिळवले रौप्य

उदगीरच्या शेख अबू सुलेमान हात फ्रॅक्चर होऊन लढला; रौप्य पदकावर कोरले नाव
शेख अबू सुलेमान
शेख अबू सुलेमानSakal
Updated on

उदगीर : आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे जागतिक थाई बॉक्सिंग (Thai Boxing) स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उदगीरच्या (udgir) शेख अबू सुलेमान महमूद (Shekh Abu Suleman Mahmud) या लढवय्या बॉक्सरने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेदरम्यान शेख अबू सुलेमान महमूद याचा हात फ्रॅक्चर (Hand Fracture) झाला. मात्र त्यानंतरही त्याने हार न मानता पदकाला गवसणी घातले.

हैदराबाद येथे थाई बॉक्सिंग एशियन चॅम्पियनशिपमध्ये इराण(Iran), श्रीलंका(Sri Lanka), इंडोनेशिया(Indonesia) या विविध देशातील स्पर्धकांचा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनचा सामना झाला. (udgirs shakh abu suleman mehmud won silver medal with fractured hand in world Thai boxing competition)

शेख अबू सुलेमान
Harbhajan Singh : हरभजन सिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शेख अबू सुलेमान महमूद (Shekh Abu Suleman Mahmud) याचा इराणच्या बॉक्सरविरुद्ध सामना होता. या सामन्यात शेख अबू सुलेमान महमूदचा हात फ्रॅक्चर झाला. मात्र महमूदने हार न मानता स्पर्धेतील पुढील सामने खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने फ्रॅक्चर हातानिशी श्रीलंका आणि इंडोनेशियाच्या बॉक्सरचा सामना केला.

उदगीर तालुक्यातील शेख अबू सुलेमान महमूदने या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. त्याच्या या झुंजार वृत्तीचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()