Latur : ‘टोमॅटो हब’मध्ये बनणार केचअप निप्युरी

वडवळला सोलार व्हेजिटेबल ड्रायरमुळे प्रक्रिया उद्योगाला चालना
Latur
LaturESakal
Updated on

लातूर : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ, जानवळ हा परिसर टोमॅटो बेल्ट म्हणून ओळखला जातो. टोमॅटोचे कधी भाव गगनाला भिडतात तर कधी इतके खाली येतात की शेतकरी ते रस्त्याच्या कडेला फेकूनही देतात. टोमॅटोच्या या व्यवसायात कमी अधिक भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परिसरात नेहमीच टोमॅटोवरील प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची चर्चा नेहमी पुढे येते. या मागणीनुसार परिसरात आता टोमॅटोवरील प्रक्रिया उद्योगाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने सोलार व्हेजिटेबल ड्रायर उपक्रमातून उद्योगाला चालना देण्यात येणार आहे. उद्योगातून टोमॅटोवर प्रक्रिया करून केचअप किंवा प्युरी तयार करण्यात येणार आहे.

Latur
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

‘उमेद’ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहे. वडवळ नागनाथ परिसरातच उद्योगाचे क्लस्टर तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून हा सोलार व्हेजिटेबल ड्रायर प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आला आहे. समितीने त्यासाठी तीन कोटी वीस लाखांचाही निधी दिल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. टोमॅटोचे उत्पादन जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने घेतात. मात्र, टोमॅटोला खात्रीने चांगला भाव मिळत नाही. सातत्याने भावाची चढउतार होत असल्याने कधी फायदा होतो तर कधी रस्त्यावर टोमॅटो फेकून देऊन लालचिखल केला जात आहे.

Latur
Parenting Tips : वर्षाच्या आतील बाळाला साखर-मीठ का देऊ नये?

या प्रकाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून टोमॅटोवरील प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. सातत्याने आश्वासने देऊनही प्रत्यक्षात उद्योगाचे स्वप्न साकार होताना दिसत नाही. महिला बचत गटांना नवी उभारी देण्यासाठी सरकारने हाती घेतल्या उमेद अभियानातून नवीन उद्योग व व्यवसाय सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. यातूनच सोलर व्हेजिटेबल ड्रायरची संकल्पना पुढे आली असून टोमॅटोवर प्रक्रिया करून केचअप तयार करणे किंवा केचअप व सॉस तयार करण्यासाठी प्युरी तयार करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

Latur
Hair Care Tips : तुम्ही केसांना कधी काळे मीठ लावलंय का? नाही तर हा प्रयोग करून बघाच

ड्रायरची अशी आहे संकल्पना

टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, हळद या भाजीपाला पिकांना सुकवलेल्या स्थितीत पोषकता कमी न होता, ज्या पद्धतीने सुकवलेले जाते, त्या ड्रायरला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मसाले, पिझ्झा, चटणीमध्ये अनेक प्रकाराचे सुकवलेल्या भाजीपाल्याचा प्रयोग केला जातो. जिल्ह्यात विशेषतः चाकूर तालुक्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त आहे. टोमॅटोला सुकवून केच अप किंवा प्युरी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञान हे पेटंट टेक्नॉलॉजी स्वरूपात आहे. फुड सोलरमध्ये खूप कमी पेटंट असून उपक्रमात उपयोगात आणल्या जाणाऱ्या ड्रायरच्या निवडीसाठी त्यांचा सध्या शोध व सर्वेक्षण सुरू असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

Latur
Career Tips : करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे; ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

आयआयटीचे सहकार्य

या उपक्रमात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे काही प्रतिनिधी सहकार्य करत आहेत. काही स्टार्टअप्सही पुढाकार घेत आहेत. या सर्वांचे बिझनेस नेटवर्किंगचा उपयोग बचत गटांना होणार आहे. त्यांच्या माध्यमातून मार्केटिंगलाही मोठी संधी आहे. केचअप व सॉसच्या उत्पादनापेक्षा प्युरीला प्राधान्य देण्यात येणार आहे. विक्री कौशल्यात बचत गटाच्या महिला कमी पडतात. यामुळे प्युरीचा पुरवठा किसान व अन्य उद्योगांना पुरवठा करण्याचे नियोजन आहे. प्युरीच्या आधारे उद्योगांनी सॉस करायचा की केचअप हे त्यांनी ठरवायचे आहे. येत्या सहा महिन्यात उपक्रमातून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

Latur
Career Tips : करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे; ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

वडवळ, जानवळ परिसरात क्लस्टर

टोमॅटोंना सुकवायचे व त्याची विक्री करायची, या दोन टप्प्यात महिला बचत गटांना ड्रायरच्या माध्यमातून काम मिळणार आहे. या उद्योगाची अजून प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान उद्योगासाठी वडवळ नागनाथ व जानवळ परिसरात नियमित टोमॅटो उत्पादन घेण्यात येत असल्याने याच परिसरात उद्योगासाठी क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. दहा ते वीस किलोमीटर परिसरात युनिट उभा केले जाणार आहे. बचत गटांनी तयार केलेले उत्पादन एकत्र केले जाणार आहे. स्लाईसिंग व ड्राईंग करून त्याची विक्री केले जाणार आहे. उत्पादन आणि विक्रीच्या सुविधा बचत गटांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पाची उभारणी केली. भूमिपुत्र म्हणून स्वतःच्या जिल्ह्यासाठी नवीन प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली. नावीन्यपूर्ण योजनेत महिलांना संधी देण्याचा प्रयत्न केला. बचत गटांना पापड व लोणचे तयार करण्याच्या पारंपारिक व्यवसायाच्या पुढे नेऊन नवीन व चांगल्या उत्पन्नाचे व्यवसाय तसेच उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून अभियानातून सुरू आहेत. सोलर व्हेजिटेबल ड्रायर हा त्याचाच एक भाग आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांचे या नवीन प्रकल्पासाठी मार्गदर्शन व पाठबळ मिळत आहे.

— देवकुमार कांबळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, लातूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.