जगायचं शिकावं तर यांच्याकडून! अंध पती आणि मूक पत्नीचा आशावादी प्रवास

ujani latur news
ujani latur news
Updated on

उजनी (जि. लातूर):  तो जन्मतःचा दोन्ही डोळ्यांनी अंध. पत्नी मूक. आर्थिक परिस्थितीही बेताचीच. तरीही हे दाम्पत्य खचले नाही. ना उमेद झाले नाही. मोठ्या संघर्षाने आनंदात संसाराचा गाडा ते हाकत आहे. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्यांपुढे हे दाम्पत्य आदर्श ठरले असून, जणू दुभंगून जाताना ते अभंगच झाले.

हसलगण (ता. औसा) येथील अनिकेत मोरे (वय ३५) हे अंध तर त्यांच्या पत्नी मुक्ता मूक. त्यांना काही शब्द उच्चारता येतात. पण, तेही बोबडे. दोघेही जन्मतःच दिव्यांग. पण, आपल्या अपंगपणाचे भांडवल न करता हे मोरे दाम्पत्य रडत, कुढत बसले नाही. मोठ्या धीराने, हिमतीने ते आहे त्या परिस्थितीला सामोरे जात आहेत.

दोन वर्षांपूर्वी त्यांना एक गोंडस मुलगा झाला. जणू त्यांच्या खडतर आयुष्यात आनंदच पसरवला. त्यांनी मुलाचे नाव शिवेंद्रराजे ठेवले. अनिकेत हे गावात पानटपरी चालवतात. सोबत खुर्चीही विणतात. अंध असूनही त्यांनी खुर्ची विणण्याचे कौशल्य आत्मसातच केले तर त्यात ते निपुण झाले. याच भरवशावर ते संसाराचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे बेरोजगारांसमोर आदर्श निर्माण झाला आहे.

त्यांच्या पत्नीही त्यांना कणखरपणे साथ देत आहेत. दोघे जरी दिव्यांग असले तरी त्यांचा मुलगा सामान्य व्यक्तीप्रमाणे आहे. त्याचाच या दोघांना मोठा आनंद आहे. त्याला खूप शिकवून मोठे करायचे, हे मोरे दाम्पत्याचे ध्येय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.