Latur Lok Sabha Election : निवडणुका आल्या की नौटंकी सुरु; काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीचा मोदींवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या लातूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर (जि. लातूर) येथे शनिवारी झालेल्या जाहिर सभेत त्या बोलत होत्या.
Latur Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi Slam BJP PM Modi Congress Shivaji Kalge Marathi Political News
Latur Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi Slam BJP PM Modi Congress Shivaji Kalge Marathi Political News
Updated on

लातूर : गेल्या सत्तर वर्षात काय केले असे म्हणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षात काय केले हे सांगत नाहीत. दहा वर्षात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, महिलांच्या समस्या वाढल्या यावर ते बोलत नाहीत. लोकसभेची निवडणूक आली की त्यांची नौटंकी सुरु झाली आहे, अशा शब्दात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

लोकसभेच्या लातूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर (जि. लातूर) येथे शनिवारी झालेल्या जाहिर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजीमंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, वैशालीताई विलासराव देशमुख, डॉ. काळगे आदी उपस्थितीत होते.

रामराम लातूरकर असे म्हणत प्रियांका गांधी यांनी भाषणाची सुरवात केली. देशात आज सत्तर कोटी बेरोजगार आहेत. केंद्रात तीस लाख पदे रिक्त असताना मोदी सरकार ते भरती करीत नाही. शिक्षित तरुणांना नोकरी नाही. महागाईने महिला त्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकडे पाहण्यास मोदींना वेळ नाही. पण अब्जाधिशांचे १६ लाख कोटी रुपये कर्ज त्यांनी माफ केले. गेल्या दहा वर्षात विकासाच्या ऐवजी लोकशाही दूर्बल केली. इलेक्टॉल बॉण्डच्या माध्यमातून देणगीच्या (चंदा) नावाने धंदा केला. कोविड व्हॅक्सीन तयार करणाऱ्यांना देखील त्यांनी सोडले नाही. पहिल्यांदा ईडीचा छापा टाकायचा आणि नंतर देणगी घेवून सोडून द्यायचे हा उद्योग केला गेला. सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सर्व काही समोर आले आहे. हे जनतेने ओळखले पाहिजे, असे गांधी म्हणाल्या.

Latur Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi Slam BJP PM Modi Congress Shivaji Kalge Marathi Political News
Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

देशात अनेक पंतप्रधान झाले. माझ्या कुटुंबातून तीन पंतप्रधान झाले. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. या सर्वांनी पंतप्रधान पदाची उंची वाढवण्याचे काम केले. पण नरेंद्र मोदी यांनी मात्र ही उंची कमी केली. इतका अहंकारी नेता पाहिला नाही. त्यांना जनतेची काळजी राहिलेली नाही. सल्लागार देखील त्यांना बोलू शकत नाहीत, इतका अहंकार त्यांच्यात आला आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. विकासावर बोलण्याऐवजी धर्म, जातीवर बोलून त्यांनी नौटंकी सुरु केली आहे. निवडणूक आली की त्यांची नौटंकी सुरु होते हे आपण पाहिले आहे. ही नौटंकी आता चालणार नाही. त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

गेल्या दहा वर्षात लोकशाही धोक्यात आली आहे. हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पैशावर आमदार खरेदी केले गेले. तुम्ही निवडलेले सरकार पाडले गेले. पैशावर राजकीय पक्षात फूट पाडली. हे सगळे तुमच्या डोळ्यासमोर झाले आहे. आता ते संविधान बदलाची भाषा बोलू लागले आहेत. या निवडणुकीत ते विजयी झाले तर संविधान बदलले जाईल. त्यामुळे यांच्यापासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

Latur Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi Slam BJP PM Modi Congress Shivaji Kalge Marathi Political News
Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

देशात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही गॅरंटी कार्ड दिले आहे. कर्नाटक, छत्तीसगढ, हिमाचलप्रदेश, तेलगंनामध्ये आमचे सरकार गॅरंटी पूर्ण करीत आहे. देशात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा जीएसटी माफ करु, एमएसपीचा कायदा तयार करु, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कायमस्वरुपी आयोग स्थापन करु, देशातील शेती मजबूत करण्याचे धोरण तयार करु, तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी पाच हजार कोटीचा निधी राखीव ठेवू, तीस लाख रिक्त पदे तातडीने भरु अशी ग्वाही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.