लातूर : एकामागून एक घडणाऱ्या खुनाच्या घटनेने लातुरात भीतीचे वातावरण असताना त्यातच आणखी एका घटनेची भर पडली. लातूर शहरातील बार्शी रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झोपलेल्या एका तरुणाचे डोके दगडाने मारून पहाटे त्याचा खून करण्यात आला. इतकेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळण्यातही आले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने लातूर पुन्हा एकदा हादरले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सचिन शिवाजी वाघमारे (वय ४५, रा. अंबाजोगाई) यास अवघ्या ५ तासांत अटक केली.