लातूर : काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मात्र, मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात चांगले पाणी आले आहे. या नदीपात्रात असलेल्या पंधरा उच्च पातळी बंधाऱ्याच्या प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.
नदीपात्रात शेवटचा होसूर बंधारा आहे. हा बंधारा सतत भरत असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आतापर्यंत या बंधाऱ्यातून ९६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा कर्नाटकात विसर्ग करण्यात आला आहे.
मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात १५ उच्चपातळीवरील बंधारे आहेत. या बंधाऱ्यांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा ६४.८४६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या या बंधाऱ्यात एकूण पाणीसाठा ३२.८९ दशलक्ष घनमीटर इतका आहे. याची टक्केवारी ५०.७३ इतकी आहे.'
काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी येत आहे. नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच बंधाऱ्यांचे एक दोन दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्र पाण्याने भरले जात आहे.
होसूर येथे मांजरा नदीच्या पात्रातील शेवटचा उच्चपातळी बंधारा आहे. या बंधाऱ्याचा प्रकल्पीय पाणीसाठा २.२५० इतका आहे. तो सातत्याने भरला जात आहे. त्यामुळे त्याचे दरवाजे उघडून पाणी नदीत सोडले जाते. आतापर्यंत ९६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी कर्नाटकात गेले आहे.
बंधारा - जलसाठा- सध्याचा साठा - टक्केवारी
लासरा - ३.००० - १.१३६ - ३७.८७
वांजरखेडा -३.६०० -२.०५२ -५७.००
टाकळगाव - १.९१६ -०.९७५ - ५०.८९
वांगदरी- ०.८४३- ०.३०५ -३६.१८
कारसा पोहरेगाव -३.४१० - १.३०६ - ३८.३०
साई -३.४७० -१.७८२ -५१.३५
नागझरी - ३.४८६ - १.७६९ -५०.७५
शिवणी - ९.८१० -५.१४३ -५२.४३
खुलगापूर- ९.७०८- ३.६२९ -३७.३८
बिंदगीहाळ - १.३५० -१.०२८ -७६.१५
डोंगरगाव - ७.९०२ - ४.२३९ -५३.६५
धनेगाव - ११.१०१ -७.०८५ -६३.८२
होसूर -२.२५० - १.३२५ -५८.८९
भुसणी- १.४९० -१.१२० -७५.१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.