लातूर : पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकले कीटकनाशक

सरवडी गावात घटना ः वेळेवर समजल्याने मोठा अनर्थ टळला
Latur Sarvadi Pesticides in water supply wells
Latur Sarvadi Pesticides in water supply wellssakal
Updated on

मदनसुरी : येथील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने कीटकनाशक मिसल्याची घटना मध्यरात्री घडली. यामुळे गावातील नागरिकांत एकच खळबळ माजली आहे. सरवडी पूर्व व सरवडी पश्चिम या दोन्ही गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणासाठी गावच्या बाजूला एक विहीर आहे. या विहिरीतून सर्व गावात नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री त्याच विहिरीत कीटकनाशक मिसळले आहे.

नेहमीप्रमाणे सकाळी गावात पाणी नळाला पाणी सुटले असता काही नागरिकांना पाण्याचा वास यायला लागला असता सेवकांनी पाणीपुरवठा बंद करून याबत सरपंच बालाजी मोहिते व ग्रामसेवक रणजित कुमारे यांना कळवले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून गावात दवंडी देऊन कोणीही पाणी पिऊ नये अशा सूचना केल्या. आरोग्य विभागालाही याबाबत ग्रामपंचायतीने कळवले आहे. विहिरीत टाकलेल्या कीटकनाशकामुळे विहिरीतील खेकडा व माशाचा मृत्यू झाला आहे.

वेळेवर ही बाब लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून या घटनेचा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच बालाजी मोहिते यांनी दिली. याची माहिती मिळताच रामलिंग मुदगड आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेवी शिंदे, डॉ. महेश चेंडकापुरे, डॉ. शिवजीराव गोडगे, आरोग्य सेविका वर्षा गायकवाड, आरोग्य सहायक एम. के. जक्कलवाड, आरोग्य सेवक जी. व्ही. सारगे, आर. एच. माशाळ या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील पाण्याचे नमुने उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पाठवले, असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी महादेवी शिंदे यांनी दिली.

नागरिकांनी पाणी फेकले

विहिरीत औषध टाकल्याची माहिती मिळताच गावातील अनेक कुटूंबाने त्या पाण्याने केलेला स्वयंपाक, घरातील पाणी सर्व बाहेर टाकून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.