लातुरात ८२ टक्के खरीप पेरणी, सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक

लखनगाव (ता.औसा, जि.लातूर) : मनोज देशमुख यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक.
लखनगाव (ता.औसा, जि.लातूर) : मनोज देशमुख यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक. सकाळ
Updated on

लातूर : जिल्ह्यात Latur काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनी Kharip Sowing वेग घेतला आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर असून, आतापर्यंत ५ लाख चार हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ८२.३३ इतकी आहे. जिल्ह्यात खरिपामध्ये सोयाबीनचे क्षेत्र Soybean सर्वाधिक आहे. यात आतापर्यंत सोयाबीनची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. खरिपाची ज्वारीची पेरणी मात्र केवळ पंधरा टक्केच झाली आहे. जिल्ह्यात जूनमध्ये पाऊस झाल्याने काही भागात पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या.latur updates 82 percent kharip sowing in district

लखनगाव (ता.औसा, जि.लातूर) : मनोज देशमुख यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक.
Hingoli Rain Updates : हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

पंधरा वीस दिवस पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर होते. पण, आठ-दहा दिवसांत रोज पावसाची हजेरी आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे जूनमध्ये पेरलेल्या पिकांना जीवदान मिळालेच आहे. पण, पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सहा लाख १२ हजार ४२१ हेक्टर असून, आतापर्यंत ५ लाख चार हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ८२.३३ इतकी आहे.

लखनगाव (ता.औसा, जि.लातूर) : मनोज देशमुख यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक.
म्यूकरमायकोसिसने तिघांचा मृत्यू, २४८ रुग्णांवर उपचार सुरु

सोयाबीनची शंभर टक्के पेरणी

जिल्ह्यात सोयाबीनच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र तीन लाख ९१ हजार २९२ हेक्टर असून, पेरणी तीन लाख ९२ हजार ३०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तुरीची ६९.६९ टक्के

तुरीचे क्षेत्र एक लाख ११ हजार ४३ हेक्टर असून ७७ हजार ३८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ६९.६९ इतकी आहे. मुगाचे क्षेत्र १३ हजार ६२ हेक्टर असून, ८ हजार १२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ६२.२१ इतकी आहे. उडदाचे पेरणीचे क्षेत्र दहा हजार ३६३ हेक्टर असून, आतापर्यंत सहा हजार २६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ६०.४० इतकी आहे. खरीप ज्वारीचे पेरणी क्षेत्र ६२ हजार २२९ हेक्टर असून, आतापर्यंत नऊ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी केवळ १५.४७ इतकी आहे.

लखनगाव (ता.औसा, जि.लातूर) : मनोज देशमुख यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक.
वैजापूर तालुक्यात अपघात, दोघा तरुणांचा मृत्यू

तालुका----------------पेरणी योग्य क्षेत्र ------------पेरणी झालेले क्षेत्र------टक्केवारी

लातूर-------------------७१५२६.८५-----------------५४६८८.००-----------७६.४६

औसा--------------------१०५८८०.००-------------८३२३५.००---------------७८.६१

अहमदपूर---------------८०१५८.४८----------६१९११.००-------------------७७.२४

निलंगा--------------------९७३१०.८८-----------७०३७६.००-----------------७२.३२

शिरूर अनंतपाळ--------२८५००.००-----------२२४५८५.००---------------८६.२६

उदगीर--------------------६२८९१.००--------------५५५५२.००--------------८८.३३

चाकूर---------------------५६८३६.७५-----------------५३१५१.००-----------९३.५२

रेणापूर---------------------४६०३२.५२---------------४०२५७.००-------------८७.४५

देवणी---------------------३५२५३.९०-----------------३३०५२.००--------------९३.७५

जळकोट-------------------२८०३०.९०---------------२७३९१.००--------------९७.७२

----------------------------------------------------------------------

एकूण----------------------६१२४२१.२८----------------५०४१९८.००------------८२.३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.