Latur Crime News : लातूर येथील विवेकानंद चौक पोलिसांची हैदराबाद येथे कारवाई ; खूनप्रकरणी एकजण ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा, विवेकानंद चौक पोलिसांची हैदराबाद येथे कारवाई
latur
latursakal
Updated on

लातूर : येथील ताजोद्दीनबाबानगर येथे काही दिवसापूर्वी दर्गा परिसरात झोपलेल्या फारुख ऊर्फ मुकड्या सुजातअली सय्यद याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करीत एकास हैदराबादमधून अटक केली आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखा व विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

येथील सराईत रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार फारुख ऊर्फ मुकड्या सय्यद याचा ता. सहा जानेवारी रोजी दर्गा परिसरात झोपलेला असताना त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मुकड्यावर येथील विविध पोलिस ठाण्याला अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याचे अनेकांशी शत्रुत्व होते. त्यामुळे त्याचा खून नेमका कोणी व कशामुळे केला यासंदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम होता.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले व विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने ता. ११ जानेवारी रोजी हैदराबाद येथे जाऊन एकाला अटक करून येथे आणले. समीर ऊर्फ जालीम अखिल शेख (वय २४, रा. साळे गल्ली, बौद्धनगर, लातूर) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याला मुकड्या खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करीत होता. समीर याने त्याला अनेक वेळा पैसेही दिले.परंतु तो दररोज पैशाची मागणी करू लागला होता. पैसे न दिल्यास तो समीरला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देत होता. याला कंटाळून समीरने रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपलेल्या मुकड्याच्या डोक्यात फरशी घालून व नंतर गळ्यावर चाकूने मारुन खून केल्याचे सांगितले. समीरवर यापूर्वी गांधी चौक पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील सहायक पोलिस निरीक्षक पल्लेवाड, नाना लिंगे, घारगे, पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे, केंद्रे, पोलिस अंमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, राजेश कंचे, पोलिस अमलदार आनंद हल्लाळे, रमेश नामदास, वाजिद चिखले, सायबर सेलचे पोलिस अमलदार गणेश साठे, शैलेश सुडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.