Latur Water Crisis : जळकोटला ९० टक्के जलस्रोत तळाला; हिवाळ्यापासूनच तालुक्यात पाण्याची टंचाई

नोव्हेंबर महिन्यातच नदी,नाले,ओढे, पाझर तलाव कोरडे पडत असल्याने यंदा उन्हाळ्यात पाण्याबाबतची स्थिती गंभीर होणार
Latur Water Crisis water scarcity in jalkot taluk latur winter 90 percent water used
Latur Water Crisis water scarcity in jalkot taluk latur winter 90 percent water usedSakal
Updated on

जळकोट : गेल्यावर्षी पाऊसकाळ चांगला झाला होता.त्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र यंदा हिवाळ्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील नव्वद टक्के साठवण तलावांनी तळ गाठला आहे. नोव्हेंबर महिन्यातच नदी,नाले,ओढे, पाझर तलाव कोरडे पडत असल्याने यंदा उन्हाळ्यात पाण्याबाबतची स्थिती गंभीर होणार आहे.

तालुक्यात यंदा पाणीटंचाईच्या झळा रब्बी पेरणीवर दिसून येत आहे. रोजगारासाठी मजुराचे स्थलांतर होत असल्याचे चित्र आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबल्या, परिणामी सोयाबीन,कापूस पिकांचे उत्पादन घटले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. दुष्काळाच्या छायेत शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक चणचण लागली आहे. त्यातच पावसाळा संपताच अनेक साठवण, पाझर तलाव,विहिरींनी तळ गाठला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यासमोर पशुधनाबरोबर,शेती वाचविण्याची धडपड सुरू आहे. ग्रामीण भागात आतापासून पाणीटंचाई झळा सोसाव्या लागत आहेत. आगामी काळात पाणीटंचाई बरोबर मजुराच्या हाताला मिळणाऱ्या कामाचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. प्रशासनाने आगामी काळाचा विचार करून प्रभावी उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे.

सध्या तालुक्यातील नाले, साठवण, पाझर तलाव, विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे वाडी-ताड्यांवर दुष्काळाची गडद छाया आतापासून दिसून येत आहे. हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण होत आहे. पुढील काळात प्रशासनाला पाणी पुरवठ्याबाबत ठोस नियोजन करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.