Latest Latur News : लाहोर येथे २६ जानेवारी १९२९ रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अखंड भारताचा ठराव झाला होता. अखंड भारत ही काँग्रेसचीच घोषणा होती. अखंड भारताचा खंडित भारत झाला. भारताची फाळणी झाल्यानंतर हिंदूंना मोठा त्रास झाला. दहा लाख हिंदू मारले गेले, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
शहरात नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. २८) बागडे यांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा झाला. यावेळी त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. तसेच, प्रवीण सरदेशमुख यांच्या ‘भारताच्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, सुधीर धुतेकर, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, अशोक शिवणे उपस्थित होते.