Latur : हासोरी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी
Latur earthquake news
Latur earthquake newsesakal
Updated on

हासोरी : येथे काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असून शासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देत ग्रामस्थ सोमवारपासून (ता. १७ ) उपोषणाला बसले आहेत. सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

Latur earthquake news
Latur : लातूर जिल्ह्यात भाजपचे 'धन्‍यवाद मोदीजी' अभियान

हासोरी सह परिसरात ता.५ सप्टेंबर पासून आजपर्यंत अनेक भूकंपाचे धक्के बसले आहेत. प्रशासनाला विनंती करूनही कुठलीच पर्यायी व्यवस्था करत नाहीत. गावात ८०% घरे दगड मातीची आहेत. गावात विजेची व्यवस्था व्यवस्थित नाही. जिल्हा परिषद शाळेची इमारत देखील धोकादायक आहे. शाळेत असलेले जलकुंभ देखील धोकादायक म्हणून प्रशासनाने पाडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शाळा भरवण्याची पर्यायी व्यवस्था करावी. गावात एकूण ६८० कुटुंबाची तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी पत्रा शेड किंवा फायबर शेडची व्यवस्था करावी. भौगोलिक गोष्टीचा विचार गावचे पुनर्वसन करावे. या मागणीसाठी येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. या सह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.

Latur earthquake news
Latur : विद्युतीकरणात मध्य रेल्वे विभागाची आघाडी

आज दुपारी निलंग्याचे तहसीलदार घनश्याम अडशूळ यांनी उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांना येऊन भेट देऊन तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे. आम्हाला तुमच्या मागण्या अस्तित्वात अनन्यसाथी आम्हांला तुम्ही आठ ते दहा दिवसाचा मुदत द्यावी असे आश्वासन तहसीलदार यांनी ग्रामस्थांना दिले. परंतु ग्रामस्थांचे यावर जोपर्यंत आमच्या माणण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार असल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदार यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.