Laxman Hake : लक्ष्मण हाके उपोषणावर पाचव्या दिवशीही ठाम;शिष्टमंडळाचा चर्चेचा आग्रह नाकारला

मुंबईत मंगळवारी (ता.१८) होणाऱ्या मंत्रिमंडळ (कॅबिनेट) बैठकीत आपल्या मागण्यांवर चर्चा करून मार्ग काढू. या बैठकीत चर्चेसाठी तुमचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवा, असे आश्र्वासन देऊन शासनाच्या शिष्टमंडळाने उपोषकर्ते, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना पाणी घेण्याची विनंती केली.
Laxman Hake
Laxman Hakesakal
Updated on

अंकुशनगर (जि.जालना) : मुंबईत मंगळवारी (ता.१८) होणाऱ्या मंत्रिमंडळ (कॅबिनेट) बैठकीत आपल्या मागण्यांवर चर्चा करून मार्ग काढू. या बैठकीत चर्चेसाठी तुमचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवा, असे आश्र्वासन देऊन शासनाच्या शिष्टमंडळाने उपोषकर्ते, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे हाके यांनी सांगितले.

त्यामुळे शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली. दरम्यान, ‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी दोघांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री (ता. अंबड) येथे उपोषण सुरू केले आहे. सरकारतर्फे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सोमवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘उपोषण सोडून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला आम्ही यावे, असे शिष्टमंडळाचे म्हणणे होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, या मागणीवर मुख्यमंत्र्यानी उत्तर द्यावे. ओबीसींना हक्क, अधिकार नाहीत का, सरकार फक्त ठराविक वर्गाचे आहे का,’ असा सवाल हाके यांनी सरकारला केला.

‘ओबीसी आमचा भाऊ आहे, आमच्यात भाईचारा आहे’, असे मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे हे गेली सात-आठ महिन्यांपासून राज्यभर सांगत आहेत. मात्र, असे सांगत असताना ते ओबीसी नेत्यांना लक्ष्य करताना दिसतात. ओबीसी भाऊ आहे तर त्यांचे हक्क, अधिकार का हिरावून घेत आहात. त्यांचे घर उद्‌ध्वस्त करत त्यांच्या छोट्या घरांमध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना ओबीसी तुमचा मित्र कसा असू शकतो? शासनातर्फे जरांगेंसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरली जाते,’ असा आरोप हाके यांनी केला. दरम्यान, हाके व वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी राज्यभरातून ओबीसी समाजबांधव मोठा प्रमाणावर वडीगोद्री येथे दाखल होत आहेत. आजही उपोषणस्थळी समाजबांधवांची गर्दी होती.

प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणीही सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते त्यामुळे हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे.

- पंकजा मुंडे,

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.