कळंब : चोर सोडून संन्याशाला फाशी

अनेक ठिकाणाहून गौण खनिजचे उत्खनन होऊनही एकालाच दंड
चोर सोडून संन्याशाला फाशी
चोर सोडून संन्याशाला फाशीsakal
Updated on

कळंब : तहसीलदारांनी तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी येथील जोतिराम वरपे यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ४० कोटींचा ४८ लाख रुपयांचा बोजा टाकण्याची कारवाई केल्याने शेतकऱ्याची झोप उडाली आहे. तहसीलदार विद्या शिंदे यांनी गौण खनिज उत्खनन प्रकरणी केलेल्या दंडाच्या कारवाईची शिक्षा एकट्या शेतकऱ्यालाच का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच यात दोषी असलेल्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जोतिराम वरपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी
वर्धा : अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार

कळंब-केज-कूसळंब या रस्त्याचे काम करण्यासाठी एक कंपनीने मस्सा (खंडेश्वरी) येथील ७५७, ७५८, ७०२, ७०३, ७०४, ७१६, ७१९ या सर्वे नंबरसह हासेगाव (केज) येथील ५३, ७९, ८०, ९४, १२३, २१५, २२२, २९४, ३२७, ३२९, ३४७, ३५०, ३६२, ३६३, ४१४ व येरमळा येथील १२१,१३२,१/अ अशा एकूण २५ सर्वेनंबर मधून गौण खनिजाचे उत्खनन केले आहे. यात परवानगी पेक्षा अधिक गौण खनिजचे उत्खनन झाल्याने मेघा कन्ट्रक्शन कंपनीला महसूल विभागाने ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. दंडाची रक्कम न भरल्याने तहसीलदारांनी तालुक्यातील वरील २५ सर्वेनंबरवर बोजा टाकण्याऐवजी मस्सा (खंडेश्वरी) येथील एकट्या जोतिराम वरपे यांच्या ७१९ सर्वेनंबरच्या सातबारा उताऱ्यावर ४० कोटी ४८ लाख रुपयांचा बोजा टाकल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी
बुलडाणा : स्‍थगित असलेली भरतीप्रक्रिया राबवावी

प्रत्यक्षात या शेतकऱ्याच्या शेतातून गौण खनिजाचा एक दगड देखील उत्खनन केला गेला नाही. त्यामुळे गौण खनिजाचे उत्खनन न करता जोतिराम वरपे यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा का टाकण्यात आला, हे न उलगडणारे कोडे आहे.या बाबत उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ म्हणाल्या की, सदरील प्रकरणात त्रुटी असून, हे प्रकरण फेर चौकशीसाठी देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()