बीड : मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली. मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, तर अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा होतात. या योजनेला मराठवाडा, खानदेशात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत २ हजार ८२२ खाती पोस्टामध्ये उघडण्यात आली. सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर विभागात ४७५ खाती उघडण्यात आली. त्यापाठोपाठ जळगावमध्ये ४२४ खाती उघडण्यात आली आहेत.
पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या एक किंवा दोन मुली, एक मुलगा एक मुलगी असल्यास हा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या एक किंवा दोन मुली, एक मुलगा व एक मुलगी असल्यास हा लाभ मिळेल. १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
लाभ कसा मिळणार?
मुलीचा जन्म झाल्यावर ५०००/- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
मुलगी पहिलीत गेल्यावर १०००/- शाळेत दाखल असल्याचा पुरावा (बोनाफाइड)
मुलगी सहावीत गेल्यावर ७०००/- शाळेत दाखल असल्याचा पुरावा (बोनाफाइड)
मुलगी ११ वीत गेल्यावर ८०००/- विद्यालयात दाखल असल्याचा पुरावा
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५०००/- अविवाहित असल्याचे स्वयं घोषणापत्र, मतदार यादीत नाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.