संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड जिल्ह्यात बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत

Published on

कडा (जि. बीड) - मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील आष्टी तालुक्‍यातील मराठवाडी, हरेवाडी देऊळगाव घाट तसेच पाथर्डी तालुक्‍यातील करंजी व परिसरातील डोंगराळ भागात बिबट्या चार ते पाच दिवसांपासून वावरताना दिसत असून या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

आष्टी तालुक्‍यातील हरेवाडी येथील शेतकरी बंडू काशीनाथ हाडे हे चार दिवसांपूर्वी हरेवाडी येथील डोंगरपट्ट्यात जनावरे चारण्यासाठी गेले असता झुडपाच्या पाठीमागे लपलेल्या बिबट्याने शेळी व गायीवर हल्ला करून फडशा पाडला होता.

देऊळगाव घाट परिसरात शुक्रवारी (ता 17) रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या इनकॉन कंपनीच्या पथकाला हा बिबट्या दिसून आला. त्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आष्टी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. यापूर्वीही देऊळगाव घाट येथे एक घोडा बिबट्याने फस्त केल्याचे सांगण्यात येत आहे. 

बिबट्याला तत्काळ जेरबंद करा 
मराठवाडी (ता. आष्टी) येथील आमच्या निवासस्थानाच्या पाठीमागील विहिरीजवळ शुक्रवारी (ता 17) रात्री झोपलेला पाळीव कुत्रा व मांजरावर बिबट्याने हल्ला चढवून त्यांचा फडशा पाडला. झटापटीच्या आवाजानंतर खिडकीतून पाहिले असता बिबट्या त्यांना खात असताना दिसला.

बिबट्याचा वावर असल्याने रात्री घरातून बाहेर पडताना अनेकदा विचार करावा लागत आहे. त्यामुळे परिसरात वनविभागाने पिंजरे लावून सदरील बिबट्याला पकडावे. 
- नवनाथ मगर, ग्रामस्थ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.