पैशासाठी जीव धोक्यात...

bank.
bank.
Updated on

हिंगोली ः शहरातील सर्वच बँकांसह एटीएम केंद्रांत मंगळवारी (ता.१२) शेतकऱ्यांसह खातेदारांनी एकच गर्दी केली होती. बँक प्रशासनाने ग्राहकांसाठी सावलीचीदेखील व्यवस्‍था केली होती. बँकेसमोर मात्र पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारपासून एक दिवसाआड अत्यावश्यक सेवा सुरू केल्या आहेत. परंतु, बँका, पोस्ट ऑफिस आदी महत्त्वाच्या घटकांना सोशल डिस्टन्सच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी व मंगळवारी दुसऱ्या दिवशीही मोंढ्यातील सर्वच बँकेसमोर रोखीचे व्यवहार व पैसे काढण्यासाठी खातेदारांनी गर्दी केली होती. तसेच जनधन खात्यातील पाचशे रुपये काढण्यासाठी मोंढ्यातील एका बँकेसमोर लांबच लांब रांग लागली होती. तसेच काही एटीएम केंद्रावरदेखील गर्दी होती.

काही ठिकाणी पाळले नियम 
जिल्‍हा मध्यवर्ती बँकेतदेखील ग्राहकांची मोठी गर्दी होती. शहरातील सर्वच बँकेत आज गर्दी झाली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात होते. मात्र, काही ठिकाणी रांगेतील ग्राहक एकमेकांजवळ उभे असल्याचे चित्र होते. बँक व्यवस्थापकांनी बाहेर येऊन नागरिकांना गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, अशा सूचना दिल्या. नागरिकांची गर्दी मात्र कायम होती. 

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर झाली होती कारवाई
नागरिक मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण फिरत असल्याचे सोमवारी (ता.११) आढळल्याने पोलिस पथकाने कारवाई करून शहर पोलिस ठाण्यात या सर्वांना आणले असता नागरिकांनी टाहो फोडत ‘साहेब, ‘तुमच्या पाया पडतो. परंतु, एक वेळ माफ करा’ अशी विनवणी केली. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस, महसूल, पालिका प्रशासन वेळोवेळी सांगत आहे. अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पडा, अन्यथा विनाकारण बाहेर पडू नये. घरी थांबा, प्रशासनाला सहकार्य करा, असे सांगूनदेखील काही महाभाग सकाळी मॉर्निंग वॉक, तर संध्याकाळी इव्हिनिंग वॉकचे कारण पुढे करीत घराबाहेर पडत आहेत. अनेक वेळा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना दम देऊन दंड आकारून सोडून दिले. तरी परत परत नागरिक पुन्हा त्याच चुका करून कोरोनाला आमंत्रित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.