परभणी - प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात शनिवारी (ता.१०) तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या तर रविवारी (ता.११) तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील चार दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअस ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता.१०) जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात ता. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व ता. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.