अवघ्या दीड वर्षीय चिमुकलीने केली मृत्यूवर मात

लातूर : तब्बल चौदा दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेल्या चिमुकलीवर यशस्वी उपचारानंतर तिला भेट वस्तू देऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यावेळी डॉक्टर व कुटुंबीय.
लातूर : तब्बल चौदा दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेल्या चिमुकलीवर यशस्वी उपचारानंतर तिला भेट वस्तू देऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यावेळी डॉक्टर व कुटुंबीय.
Updated on
Summary

मुलगी नको मुलगाच हवा, असा अट्टहास करणाऱ्या आजच्या युगात भिसे यांनी कधीही आपल्याला दोन्ही मुलीच आहेत म्हणून खंत व्यक्त केली नाही. उलट दोन मुलींचा पिता असल्याचा त्यांना गर्व आहे.

लातूर : एका दीड वर्षीय मुलीच्या मेंदूची वाढ होत नसल्यामुळे अंगाची होणारी थरथरी, झटके व न्युमोनियाचा ॲटॅक आला. शरीरातील ऑक्सिजनची Oxygen पातळी कमी जास्त होत असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तसेच झटक्याचे प्रमाण वाढत गेले. तिला व्हेंटिलेटरवर Ventilator घ्यावे लागले. १४ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या एका दीड वर्षाच्या चिमुकलीने दोन महिन्यांच्या रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर मृत्यूवर मात केली आहे. तिला रुग्णालयातून सुटी देताना डॉक्टर, कर्मचारी आणि चिमुकली व तिचे कुटुंबीय या सर्वांच्याच चेहऱ्यावरचा आनंद भारावून टाकणारा होता. हैदराबादच्या Hyderabad संगारेड्डी जिल्ह्यातील शंकरपल्ली येथील व्यावसायिक राजकुमार भिसे यांना मोठी पाच वर्षांची सृष्टी व दीड वर्षाची छोटी स्वरांजली अशा दोन मुली आहेत. मुलगी नको मुलगाच हवा, असा अट्टहास करणाऱ्या आजच्या युगात भिसे यांनी कधीही आपल्याला दोन्ही मुलीच आहेत म्हणून खंत व्यक्त केली नाही. उलट दोन मुलींचा पिता असल्याचा त्यांना गर्व आहे. अचानक छोटी मुलगी स्वरांजलीची प्रकृती बिघडल्याने राजकुमार भिसे यांनी तिला संगारेड्डी येथील डॉक्टरांकडे नेले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने भिसे परिवार मोठ्या चिंतेत होता. राजकुमार यांचे उदगीर येथील मेव्हुण्यांनी स्वरांजलीला उपचारासाठी लातूरला Latur आणावयास सांगितले. ता. २१ जानेवारी २०२१ रोजी लातुरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक आरदवाड यांच्या आरदवाड हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. डॉ. आरदवाड यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. धर्मराज दुड्डे यांनी स्वरांजलीच्या सर्व चाचण्या केल्या. आजाराचे निदान झाले. त्यानंतर उपचाराला गती मिळाली. या काळात तिचे कुटुंबीय रुग्णालयाच्या बाहेर रात्र काढून ती बरी होण्यासाठी प्रार्थना करीत होते. सुरुवातीला स्वरांजली स्वत:चे हातपायही हलवत नव्हती. तिच्या अंगात थरथरी होती. ती डोळेही उघडत नव्हती. आता ती बरी झाली आहे. Little Girl Overcome Severe Disease And Cured

लातूर : तब्बल चौदा दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेल्या चिमुकलीवर यशस्वी उपचारानंतर तिला भेट वस्तू देऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यावेळी डॉक्टर व कुटुंबीय.
औरंगाबाद हे नवीन औद्योगिक शहर बनत आहे : अमिताभ कांत

पाच महिन्यानंतर झाली बरी

डॉक्टरांनी रुग्णालयातातील कर्मचाऱ्यांकडून केलेले अथक प्रयत्न कामी आले. दोन महिन्यांच्या दवाखान्यातील व तीन महिन्यांच्या बाह्य उपचारानंतर आता स्वरांजली एकदम तंदुरुस्त झाली आहे. तिला रुग्णालयातून सुटी देताना सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद होता. रुग्णालयातील डॉक्टरांकडून व कर्मचाऱ्यांकडून तिला भेट वस्तू देऊन घरी पाठविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()