नांदेड : लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करुन भादवीच्या १८८ अंतर्गत १२५ जणांवर ड्रोनच्या साह्याने गुन्हे दाखल केले. तसेच अवैध देशी व विदेशी दोन लाख ९१ हजार १२२ रुपयाचे मद्य जप्त करून ३७ गुन्ह्यात ४२ जणांना अटक केली आहे. ह्या कारवाया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.
कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मागील १८ मार्चपासून पोलिस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्तात तैणात आहेत. याचा फायदा अवैध धंदेवाले घेत आहेत. शहर व परिसरात जुगाराचे अड्डे, देशी व विदेशी मद्य विक्री, शिंदी तसेच वाळू उपसा हे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध धंद्येवाले आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात व शहरात लॉकडाऊनच्या काळात कुठलाही अवैध धंदा सुरू ठेवला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी संबंधीत ठाणेदारांना आणि स्थानिक गुन्हे शोध शाखेला दिल्या.
हेही वाचा - एकीकडे कोरोना...तर दुसरीकडे भूकेचा झगडा
दोन लाख ९१ हजार १२२ रुपयाचा मुद्देमाल जप्त
यावरून जिल्हाभरात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, महादेव मांजरमकर, रमाकांत पांचाळ, सुनील नाईक यांच्या पथकांनी अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्यास पोलिस निरिक्षक श्री. चिखलीकर यांनी सुचना दिल्या. यावरुन या पथकांनी विविध ठिकाणी कारवाई करुन अवैध देशी व विदेशी दारु जप्त केली. ३७ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करून त्या गुन्ह्यातील ४२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ९१ हजार १२२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर काही जुगार अड्ड्यावरही पथकांनी कारवाई केली.
येथे क्लिक करा - रेल्वेकडून गरजूना अन्नधान्याची मदत
ड्रोनच्या साह्याने १२५ जणांना अटक
यासोबतच लॉकडाऊनच्या काळात गल्लीबोळात तसेच अडचणीच्या ठिकाणी कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या आवाहनाला हरताळ फासत लॉकडाऊनच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या समाजकंटाकावर ड्रोन कॅमेराच्या साह्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. हे पथक ज्या भागात गस्त घालण्यासाठी गेले त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यामातून अनेकांवर भादवीच्या १८८ कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाभरात १०० गुन्हे दाखल करुन १२५ जणांना अटक केली. त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडण्यात आले. अवैध धंदेवाल्यानी आपले काळे कारनमे थांबवावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागे असा इशारा पोलिस निरीक्षक श्री. चिखलीकर यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.