नांदेड : कोरोना विषाणूचे संक्रमण टाळता यावे म्हणून लॉकडाउनच्या काळात महावितरणने विजेच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडींग घेणे व वीजबिल वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महावितरणचे मोबाईल ॲप वापरणाऱ्या वीजग्राहकांनी ॲपव्दारे आपल्या वीजमीटरचे रीडींग नोंदवायचे आहे. त्यानुसार संबंधीत ग्राहकांना या महिन्याचे वीजबील दिले जाणार आहे. ॲपव्दारे रीडींग न देणाऱ्या ग्राहकांना सरासरी बील देण्यात येणार आहे. त्यानुसार वीजग्राहकांनी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा वापर करून ऑनलाईन वीजबीलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
लॉकडाउनच्या सद्यस्थितीत वीजबील वाटप करता येणार नाहीत त्यामुळे ग्राहकांच्या नोंदणकृत मोबाईलवर एसएमएसव्दारे बिलाची माहिती पाठवण्यात येत आहे. त्याचबरोबर महावितरणच्य www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲपवर वीजबीलाची माहिती पाहता येईल. जे ग्राहक मीटर रीडींग पाठवणार नाहीत अशा ग्राहकांना सरासरी बील देण्यात येत आहे. सरासरी बिलामध्ये अनेकदा कमी किंवा जास्त रीडींगचे बिल येवू शकते. ही बाब लक्षात घेऊन लॉकडाउन संपल्यानंतर महावितरण अशा ग्राहकांचे नेमके मीटर रीडींग घेवून सरासरी बिलातील फरक दूर करणार आहे.
हेही वाचा - परभणीच्या महापौर, उपमहापौरांवर गुन्हा
मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत
महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करणे शक्य झाले आहे. त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व अॅपवर उपलब्ध आहे.
'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे
नेटबॅंकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
येथे क्लिक करा - ‘कोरोना’चा नांदेड जिल्ह्याला सध्या तरी दिलासा...
एसएमएसव्दारे वीजपुरवठा व बीलासंदर्भात माहिती
असा नोंदवा मोबाईल क्रमांक : नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस देवून आपला बारा अंकी वीजग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. या एका एसएमएस वरून ग्राहकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. या शिवाय महावितरणच्या संकेतस्थळावरून व मोबाईल ॲपवरूनही नोंदणी करता येते. नोंदणी झाल्यानंतर वीजग्राहकांना एसएमएसव्दारे वीजपुरवठा व बीलासंदर्भात माहिती देण्यात येते.
एसएमएस प्राप्त झाल्यापासून पाच दिवसात रीडींग पाठवू शकतात
ग्राहक रीडींग कधी पाठवू शकतात: नोंदणीकृत मोबाईलवर रीडींग सबमीट करण्याचा संदेश पाठवला जाईल. एसएमएस प्राप्त झाल्यापासून पाच दिवसात रीडींग पाठवू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाईल नोंदणी झालेले नाहीत त्यांना एसएमएस पाठवला जाणार नाही. अशा ग्राहकांनी त्यांच्या मागील महिन्याच्या किंवा जुन्या बिलावरील चालू महिन्याची रीडींग तारीख बघावी. त्या तारखेच्या किमान एक दिवस आधीपासून असे पाच दिवसात रीडींग घेवून नोंदवणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.