दिलासादायक! लोहारा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला. एप्रिल, मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली
covid 19
covid 19covid 19
Updated on

लोहारा (उस्मानाबाद): मागील १० दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली. सध्या एकूण केवळ ६३ रुग्ण उपचाराखाली आहेत. रुग्ण संख्या घटल्यामुळे तालुक्यात सुरू असलेले बहुतांश विलगीकरण कक्ष बंद करण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गाची तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने अद्यापही भीतीची टांगती तलवार कायम आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला. एप्रिल, मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागली तशी मृत्यूचाही आकडा वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे शहरातील ग्रामीण रुग्णालय, सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडू लागला. त्यामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.

covid 19
खरिपाची केवळ २१ टक्के पेरणी; अनेक भागात पावसाची प्रतीक्षा

एप्रिल ते १० जून या अडीच महिन्यात बाधित रुग्ण संख्या प्रचंड वाढली. शहरासह धानुरी, जेवळी, माकणी, आष्टाकासार, नागूर, कानेगाव, वडगाव, सास्तूर या गावांत कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने सर्वाधिक रुग्ण येथे आढळून आले.रुग्णालयात जागा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी धावपळ करावी लागली. काही संस्था व दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून ग्रामीण भागात विलगीकरण कक्षाची सुरुवात केल्याने काहीसा दिलासा मिळाला.

अशा कठीण परिस्थिती तालुका आरोग्य विभागाने मोठ्या धैर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे मागील पंधरा दिवसापासून रूग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. भातागळी, सास्तूर, नागूर, जेवळी, भोसगा आष्टाकासार यासह अन्य ठिकाणी सुरू असलेले विलगीकरण कक्ष बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण तीन हजार ७ हजार ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यातील तीन हजार ६१६ रुग्ण बरे झाले आहेत. ७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात एकूण केवळ ६३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

covid 19
Beed Updates : कृषी दिनी शेतकऱ्यांनी पुकारले चुलबंद आंदोलन

चार दिवसांत एकही रुग्ण नाही
आरोग्य विभाग व नागरिकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने कमी झाली आहे. या चार दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही. मागील पंधरा दिवसांत केवळ सात रुग्ण आढळून आले आहेत. सध्या तीन बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात एकूण ५७५ बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ५५६ रूग्ण बरे झाले तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता ही लसीकरणाच्या प्रमाणावर खूप जास्त अवलंबून राहील. त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची आवश्यकता आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून पूर्व तयारी करण्यात येत आहे.
- डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी, लोहारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.