Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

sharad pawar dhananjay munde.png
sharad pawar dhananjay munde.png
Updated on

मुंबईः बीड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. बीडच्या परळी, केज आणि धारुर तालुक्यात बोगस मतदान केल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. त्यांनी तशी तक्रारदेखील निवडणूक आयोगाकडे केली आहे. आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करत आवाज उठवला आहे. आता खुद्द शरद पवार यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

'एबीपी माझा'शी बोलताना शरद पवार म्हणाले की, बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचे प्रकार घडले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. असे प्रकार घडत असतील तर काळ सोकावू शकतो. लोकांना मतदान न करु देण्याचे गंभीर प्रकार बीडमध्ये घडलेले आहेत. तसेच प्रकार बारामती येथेही घडले आहेत, असं म्हणत कठोर कारवाई करण्याची मागणी पवारांनी केली आहे.

sharad pawar dhananjay munde.png
Pune Porsche Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

रोहित पवारांचं ट्वीट

बीड जिल्ह्यात विशेषतः परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे.

sharad pawar dhananjay munde.png
Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

बीड लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मागच्या आठवड्यात या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी पत्रात म्हटलं की, परळी मतदार संघातील इंजेगांव, सारडगांव, धर्मापुरी, डिग्रस, नाथ्रा, कीडगांव साबळा, जिरेवाडी, बालेवाडी व कन्हेरवाडी या गावातील मतदान केंद्रावर व मतदान केंद्र क्रमांक १८८, १८९, १३२ व १६१ आणि केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव, माजलगांवमधील गोविंदवाडी व धारुर मधिल सोनिमोहा, पिंपरवडा, मंदवाडी व चाडगांव आष्टीमधील वाली आणि पाटोदा मधील वाघीरा हे सर्व मतदान केंद्र ताब्यात घेवून बोगस मतदान केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.