BV Srinivas : खोटे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारला या निवडणूकीतुन हद्दपार करा : बी. व्ही. श्रीनिवास

अंबादास दानवे यांनी संविधान बचावासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन
Ambadas Danve
Ambadas Danvesakal
Updated on

उमरगा, (जि. धाराशिव) - खोटे आश्वासन देऊन नागरिकांची दिशाभुल करत दहा वर्ष सत्तेत असलेल्या मोदी सरकारला या निवडणूकीतुन हद्दपार करा. भारतीय संविधान बदलण्याचे षडयंत्र आखले जात आहे. विकास कामांच्या नावाने बनवाबनवी करण्यात मोदी सरकार पटाईत आहे.

देशात महागाईने कळस गाठल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. हे चित्र बदलायचे असल्यास इंडिया आघाडीला पवित्र मतदान करावे. सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी कर्तत्वतत्पर असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा निवडूण द्यावे असे आवाहन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी केले.

तालुक्यातील पेठसांगवी येथे सोमवारी (ता.२९) युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा व धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्राचे प्रभारी उदय भानू (जमुकाश्मीर), संयोजक तथा युवक काँग्रेसचे महासचिव महेश देशमुख, प्रदेश चिटणीस अभिजित चव्हाण, अमर खानापुरे, जयप्रकाश निंबाळकर, हनुमंत सांगवीकर, जेष्ठ नेते बाबा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, शिवसेनेचे प्रा. डॉ. संजय कांबळे, रणधीर पवार, अशोकराजे सरवदे, बाबुराव शहापुरे, बसवराज वरनाळे, रज्जाक अत्तार, विजयकुमार नागणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, विजयकुमार सोनवणे, एस. के. सुरवसे, नानाराव भोसले, विजय दळगडे, मधुकर यादव, अभिषेक औरादे, सय्यद खलील, अँड. एस. पी. इनामदार आदींची उपस्थिती होती.

या वेळी युवक काँग्रेसचे कुणाल राऊत, श्री. चव्हाण, संभाजी बिग्रेडचे अभिमन्यू पवार यांची भाषणे झाली. शोभा कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले. दरम्यान युवक काँग्रेसचे महासचिव महेश देशमुख या सभेचे उत्तम नियोजन करून महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण केले होते.

संविधान बचावासाठी एकत्र या

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेने घरा घरात भांडण लावून घर घरात ठेवले नाही. कुटूंबा- कुटूंबात कलह लावून दिला आहे. बायको एका पक्षात तर नवरा दुसऱ्या पक्षात अशी अवस्था असून भारतीय राज्य घटना बदलण्याचे षडयंत्र चालू झाले आहे. भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचून सामान्य माणसाचे सरकार सत्तेत बसवा, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.

महागाई गगनाला भिडली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव दिला जात आहे. कांदा शेतकऱ्यांना रडवतो आहे. देशाचा विकास खऱ्या अर्थाने काँग्रेसने केला असून भाजपा सरकार पाकिस्तानला मजबूत करण्याचे काम करीत असल्याची टीका केली. हर घर जल, घरावर छत, आयुष्यमान भारत, किसान किर्डीट कार्ड या योजना नावापुरत्याच राहिल्या आहेत.

अबकी बार चारशे पार.. ही घोषणा 'माँईड गेम' करणारी असुन, त्यांना दोनशेच जागा मिळतील, असे श्री. दानवे म्हणाले. खासदार ओमराजे हा सर्वसामान्य लोकांचा हक्काची लोकप्रतिनिधी आहे, त्यांना पुन्हा संसदेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.