Vaijapur Crime News : प्रेमप्रकरणातून निर्घृण खून; आईवडिलांवर तलवारीने हल्ला, दोघांना जन्मठेप

वैजापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
love affair causes death of youth attack on parents two sentence imprisonment vaijapur
love affair causes death of youth attack on parents two sentence imprisonment vaijapurSakal
Updated on

- मोबीन खान

Vaijapur News: प्रेमप्रकरणातून तरुणाच्या आईवडिलांवर तलवारीने हल्ला करून भावाची निघृणपणे हत्या करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लाखखंडाळा येथील दोन मारेकऱ्यांना येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान याच खटल्यातील अन्य दोघांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रेमप्रकरणातून घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे वैजापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

रोहिदास छगन देवकर (वय ५२), देविदास छगन देवकर (वय ४७ ) अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत तर. भीमराज बाळासाहेब गायकवाड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हे सर्व वैजापूर तालुक्यातील लाखखंडाळा येथील रहिवासी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील लाखखंडाळा येथील अमोल बाळासाहेब गायकवाड हा घरी कामावर जात असल्याचे सांगून निघून गेला होता.

दरम्यानच्या काळात शेजारी राहणारी एक मुलगीही बेपत्ता झाली होती. काही दिवस निघून गेल्यानंतर शेजारी राहणारे रोहिदास आणि देविदास देवकर हे दोघेही गायकवाड यांच्या घरी गेले व अमोलच्या आई-वडिलांना त्यांनी तलवार व कोयत्याचा धाक दाखवून आमची मुलगी कुठे आहे?

असा जाब विचारून तुमचा मुलगा अमोल यानेच आमची मुलगी पळवून नेलीं असे म्हणत तलवारीने वार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात अमोलचे आईवडील गंभीर जखमी झाले. स्वतःचा बचाव करण्यासाठी ते शेजारी गेले.

शेजाऱ्यांनी मदत करून त्या दोघांनाही गंभीर अवस्थेत वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अमोलचे वडील बाळासाहेब व आई अलकाबाई यांच्यावर रुग्णालयात उपचार असतानाच घरात झोपलेला अमोलचा लहान भाऊ भीमराज याचा झोपेतच खून करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरले.

love affair causes death of youth attack on parents two sentence imprisonment vaijapur
Hingoli Crime News : हिंगोलीच्या कुलस्वामिनी महिला पतसंस्थेत 10 कोटींचा घोटाळा; ११ महिलासह १६ जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान याप्रकरणी रोहिदास देवकर, देविदास देवकर यांच्यासह सागर देवकर, जालिंधर जेजुरकर यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. परंतु त्यानंतर या प्रकरणाचा तपास डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

प्रकरणाचा तपास झाल्यानंतर वैजापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये एकूण अठरा साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. या खटल्यात अमोलच्या आईवडिलांसह. रासायनिक वैद्यकीय अहवाल व आरोग्य प्रशासनाची साक्ष महत्त्वाची ठरली.

love affair causes death of youth attack on parents two sentence imprisonment vaijapur
Solapur Crime : विवाहितेचा विनयभंग करुन पतीस मारहाण; एसआरपीएफ जवानासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए यांनी रोहिदास व देविदास देवकर यांना कलम ३०२, ३४ अन्वये जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास,

कलम ३०७, ३४ अन्वये पाच वर्षे शिक्षा व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिने साधी कैद, कलम ४४९, ३४ अन्वये तीन वर्षे शिक्षा, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम २०१ अन्वये देविदास देवकर याला एक वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ठोठावण्यात आली आहे.

तसेच याच प्रकरणातील अन्य सागर देवकर व जालिंदर जेजुरकर या दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे वकील बाळासाहेब मेहेर यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून फौजदार विठ्ठल जाधव यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.