महाआवास घरकुल बांधकामात हिंगोली विभागात अव्वल

जानेवारी ते मार्च २०२१ या त्रैमासिकातील अहवालानुसार हिंगोली जिल्हा महाआवास योजनेमध्ये विभागात प्रथम क्रमांकावर आहे.
हिंगोली घरकुल आवास योजना
हिंगोली घरकुल आवास योजना
Updated on

हिंगोली : ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांचे महाआवास त्रैमासिकाचे विमोचन सोमवारी (ता. २८) जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले असून घरकुल बांधकामात जिल्ह्याने विभागात अव्वल स्थान पटकावले आहे.

जानेवारी ते मार्च २०२१ या त्रैमासिकातील अहवालानुसार हिंगोली जिल्हा महाआवास योजनेमध्ये विभागात प्रथम क्रमांकावर आहे. अहवालानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन २०१६- १७ ते २०२०- २१ या कालावधीमध्ये जिल्हाला ११ हजार ७७ घरकुलांचे उद्दिष्ट दिले असून त्या पैकी सहा हजार ७११ घरकुलांचे कामे पूर्ण करुन विभागात प्रथम क्रमांकावर आहे.

हेही वाचा - नागपुरात डेल्टा प्लस व्हेरियंटचे ८ संशयित रुग्ण

शबरी आवास योजना ग्रामीण सन २०१६- १७ ते २०१९- २० या कालावधीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे दोन हजार ९८२ घरकुलांचे उद्दिष्ट दिले असून त्या पैकी दोन हजार २८० घरकुल पुर्ण करुन विभागात प्रथम क्रमांकावर आहे. पारधी आवास योजनेत ३५ पैकी ३५ घरकुले पूर्ण करून राज्यात व विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच रमाई आवास योजना ग्रामीण सन २०१६ - १७ ते २०१९- २० या कालावधीमध्ये जिल्हाला सहा हजार ७०८ घरकुलांचे उद्दिष्ट दिले असून त्यापैकी ४ हजार ४१८ घरकुल पूर्ण करून विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी त्यांचे त्रमासिकाच्या संपादकीय लेखात विविध घरकुल योजनेमध्ये औरंगाबाद विभागात हिंगोली अग्रेसर असून चांगली कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

येथे क्लिक करा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पार पडलेल्या 24 प्रकारच्या परीक्षांचा पेच मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर निर्माण झाला आहे. त्यावर आता पुन्हा आयोगाने सरकारकडून मार्गदर्शन मागवले आहे.

सदरील त्रैमासिकाचे जिल्हास्तरीय विमोचन राधाविनोद शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहोरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी सह प्रकल्प अधिकारी जी. पी. बोथीकर, सहाय्यक लेखा अधिकारी मनोज पिंनगाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश पाटील, संतोष काळे, फारानोद्दिन सय्यद, सचिन इंगोले आदींची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.