बीड- शहरात ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होती. यावेळी सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, महादेव जानकार इत्यादी प्रमुख नेते सभेसाठी उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर यांनी आपलं भाषण थांबवत छगन भुजबळ यांच्या चरणाचे आशीर्वाद घेतले आहेत. (Mahadev Jankar speech in beed obc rally melawa held Chhagan Bhujbal feet Elgar Sabha)
महादेव जानकर हे भाषण करण्यासाठी उभे होते. यावेळी भाषण थांबवत त्यांनी व्यासपीठावर असलेल्या छगन भुजबळ यांचे चरण स्पर्श केले. आज मुंडे साहेब हयात नाहीत. पण, छगन भुजबळ जिवंत आहेत. आम्ही तुमच्याकडे वडिलधारे म्हणून पाहतो. आज मी तुमचे पाय धरणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी आम्ही जिवाचं पाणी करु, असं म्हणत ते भुजबळांच्या चरणी नतमस्तक झाले.
गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे हुंकार आहेत. मुंडेंनी मला मानसपुत्र मानलं होतं. मुंडे साहेबांची जागा छगन भुजबळ यांना भरुन काढायची आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा. त्यासाठी सर्व काही करण्याची आमची तयारी आहे, असं जानकर भाषणावेळी म्हणाले.
बीडमध्ये ओबीसींची एल्गार मेळावा घेण्यात आला. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मराठा समाजाला विरोध नाही, पण आमचं आरक्षण घेणार असाल तर आम्ही त्याच्याविरोधात जाणारच असं भुजबळ म्हणाले.
मला काहीही नको. माझ्या समाजातील, ओबीसीतील हक्कांचं रक्षण करणं आमचं काम आहे. बाबासाहेबांनी गौरगरिबांच्या कल्याणासाठी संविधान लिहिलं. त्यात जे आरक्षण दिलं आहे ते वाचवणं आमचं तुमचं काम आहे. आमचे लोक इतरांप्रमाणे चांगल्या मार्काने पास होतात. आमचे पोरं देखील हुशार आहेत. पण, तो आमची लायकी काढतो, असं म्हणत त्यांनी टीका केली. ( Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.