Mahavitaran Strike : खाजगीकरणाच्या विरोधात ७२ तासांचे आंदोलन

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी संपावर
maharashtra Mahavitaran Strike 72-hour protest against privatisation jalna maharashtra
maharashtra Mahavitaran Strike 72-hour protest against privatisation jalna maharashtra Esakal
Updated on

जालना : महावितरणचे खाजगीकरणाला अधिकारी, कर्मचारीचा विरोध असल्याने महावितरमचे कर्मचारी मंगळवारी (ता.तीन) मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर असल्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे.

मस्तगड येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात झालेल्या बैठकीत महावितरण कंपनीच्या नफ्याच्या भागामध्ये अदानी, खाजगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवानगी देऊन नका. त्याच पद्धतीने इतर दोन कंपन्यांमध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचे खाजगीकरण करू नये, अशी मागणी करण्यात आली.

या संपामध्ये कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही आर्थिक व इतर मागण्या नाहीत. त्यामुळे सरकार व प्रशासनाने याबद्दल भूमिका स्पष्ट करावी, असेही संघर्ष समितीने बैठकीमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, यावर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणचे कर्मचारी, अधिकारी ७२ तासांच्या संपावर आहेत.

या संपामध्ये कर्मचारी, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक हे कामावर हजर राहणार नाहीत. उपकेंद्र सहायक, विद्युत सहायक, कनिष्ठ कार्यालयीन सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंते, अप्रेंटिस व ग्राम विद्युत सहायक हे या संपामध्ये सहभागी होणार असल्याचे संघर्ष समितीकडून सांगण्यात आले आहे.

शिवाय संपादरम्यान कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली तर संघर्ष समिती त्यांच्या पाठीशी उभी राहणार असून तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कामगाराला कायम करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, संप काळामध्ये वीज निर्मिती बंद करणे, उपकेंद्रामध्ये तांत्रिक बिघाड करणे, वीज पुरवठा मुद्दाम खंडित करणे, वीज ग्राहकाला त्रास होईल असे कोणतेही कृत्य केले जाणार नाही, असे संघर्ष समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणच्या संपाचे पसरले मेसेज

कुंभार पिंपळगाव : महावितरणच्या खाजगीकरणाविरूद्ध मध्यरात्रीपासून बुधवार(ता.चार), गुरुवार, शुक्रवार असा तीन दिवसाचा संप असल्याने वीज ग्राहकांनी आपली विजेशी संलग्न महत्त्वाची कामे रात्री बारा वाजेपर्यंत उरकून घ्यावीत,

मोबाईन,इनव्हर्टर चार्जिंग,दळण त्याचप्रमाणे पाण्याच्या टाक्‍या भरून घ्याव्यात असे मेसेज मंगळवारी (ता.तीन) सकाळपासून सर्वच व्हॉट्‌सअप ग्रुपवर व्हायरल झाले.

त्यामुळे ग्रामस्थांत अस्वस्थता पसरली. तीन दिवस विजेचा खोळंबा होणार याचे दडपण,भिती याचीच चर्चा सुरू झाली. अनेक ग्रामस्थांनी घरातील मोठमोठ्या टाक्‍या पाण्याने भरून ठेवल्या. अनेकांनी गिरणीतून दळणही आणून ठेवले, गिरणीतही गर्दी होती.

अनेक व्यापाऱ्यांनी दुकानातील वजनकाटे चार्जिंग करून ठेवले, इनव्हर्टर,जनरेटर तयार ठेवले. काही पाणी विक्रेत्यांनी टॅंकर भरून ठेवले, गावातील पाणी फिल्टरच्या दुकानावरही साठा करून ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.