Maharashtra Politics : राज्यात नवे समीकरण; परभणी जिल्ह्यात नवा पेच

मतदारसंघांत परिस्थिती बिकट, जागा वाटपावरून होऊ शकतो गोंधळ
maharashtra politics ncp crisis sharad pawar ajit pawar parbhani lok sabha election
maharashtra politics ncp crisis sharad pawar ajit pawar parbhani lok sabha electionsakal
Updated on

परभणी : राज्याच्या राजकारणात गत वर्षभरापासून एकापेक्षा एक मोठे बदल पाहावयास मिळत आहेत. एकमेकांवर नेहमी तोंड सुख घेणारे राजकारणी आता नव्या समीकरणाच्या बंधनात बांधले गेले आहेत.

राज्यस्तरावर हे समीकरणे ठरवली जात असली तरी याचा सर्वात मोठा परिणाम प्रत्येक मतदार संघावर दिसून येत आहे. नवी समीकरणे झाली. परंतु, त्यातून आता मतदार संघात नवे पेच उभे राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

परभणी जिल्ह्यात एक लोकसभा व चार विधानसभा मतदार संघ आहेत. यापैकी लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहे. या ठिकाणी संजय जाधव हे या मतदार संघाचे गेल्या दुसऱ्या वेळी प्रतिनिधित्व करत आहेत.

maharashtra politics ncp crisis sharad pawar ajit pawar parbhani lok sabha election
NCP-Shivsena : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्धव ठाकरें गटाचा 'एकला चलो'चा नारा; मविआतून पडणार बाहेर?

चार विधानसभेपैकी परभणी शिवसेना (ठाकरे गट), पाथरी कॉंग्रेस, गंगाखेड रासप आणि जिंतूर भाजपकडे आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि आता अजित पवार यांचा युतीला पाठिंबा यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. जागा वाटपावरून गोंधळ निर्माण होऊ शकण्याची दाट शक्यता आहे.

परभणी विधानसभा मतदार संघ

परभणी विधानसभेचा विचार केल्यास परभणीची जागा ही सद्या ठाकरे गटाकडे आहे. डॉ. राहुल पाटील हे या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर परभणीच्या जागेवर भाजपची नजर लागून राहिलेली आहे.

या जागेची तयारीही भाजपने सुरु केली आहे. परंतु, आता अजित पवार यांनी युतीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे खंदे समर्थक प्रताप देशमुख यांनाही आमदारकीचे स्वप्न पडले नाही तर नवलंच म्हणावे लागेल. कारण, यापूर्वीही प्रताप देशमुख

यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून परभणी विधानसभा लढवली होती. भाजपच्यावतीने परभणी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांसह अजित पवार गटातील इच्छुकांसमोर पेच उभा आहे.

maharashtra politics ncp crisis sharad pawar ajit pawar parbhani lok sabha election
NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

गंगाखेड विधानसभा मतदार संघ

गंगाखेड विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत. हा पक्ष भाजपचा मित्र पक्ष आहे. परंतु, या ठिकाणी आता भाजपकडून संतोष मुरकुटे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

या ठिकाणी माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सीताराम घनदाट यांनी अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांची मुकसंमती ही अजित पवारांच्या नेतृत्वालाच असावी, अशी शक्यता आहे. असे झाले तर अजित पवार गटाकडून हे दोन नेते देखील इच्छुकांच्या यादीत असणारचं.. मग जागा वाटपात इथेही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

maharashtra politics ncp crisis sharad pawar ajit pawar parbhani lok sabha election
NCP Political Crisis: बुडत्याचा पाय अधिक खोलात! राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात करावी लागणार कसरत

पाथरी विधानसभा मतदार संघ

पाथरी विधानसभा मतदार संघाचे सध्या कॉंग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आमदार आहेत. या ठिकाणी माजी आमदार मोहन फड हे भाजपकडून इच्छुक आहेत. त्याच ठिकाणी नव्याने उदयास आलेले नेतृत्व सईद खान हे देखील या ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडील इच्छुकांच्या यादीत आहेत.

त्यात भरीस भर म्हणून माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, दादासाहेब टेंगसे या नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप व शिंदे गटातही जागेवरून पेच निर्माण होऊ शकतो.

जिंतूर विधानसभा मतदार संघ

जिंतूर विधानसभा मतदार संघाचे सध्या भाजपच्या मेघना बोर्डीकर या प्रतिनिधित्व करत आहेत. या ठिकाणी मात्र सध्यातरी सरळ सरळ लढत आहे.

maharashtra politics ncp crisis sharad pawar ajit pawar parbhani lok sabha election
Ajit Pawar NCP : अजित पवार-जयंत पाटील एकत्र येणार; उद्या होणारी 'ही' बैठक दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची

या ठिकाणी जागेचा पेच निर्माण होण्याची शक्यता धुसरच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे माजी आमदार विजय भांबळे हे या ठिकाणावरून इच्छुक आहेत. ही लढत सरळ सरळ होण्याची शक्यता आहे.

लोकसभा मतदारसंघातही चढाओढ होणार

महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर २०२४ च्या निवडणुकीसाठी पेच उभा राहिला आहे. कारण, लोकसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा सामना करावा लागतो. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ही जागा कोण लढविणार, हा मुद्दा चर्चेला येत होता. आता जागा वाटपात चढाओढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.