Latest Marathi News: भूम तालुक्यात रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या खाणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर चिंचपूरला येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे शेतकरी करण्यासाठीचा मार्ग बंद झाला आहे .
भूम तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात सध्या सोयाबीन काढणी जोरात चालू असून दोन दिवसापासून पावसाने जोर धरल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहे .भूम तालुक्यात खरीप हंगामात यावर्षी ४६ हजार ५२७ सेक्टर क्षेत्रावरील पिके पावसामुळे धोक्यात आले आहे .