Pathari VIdahnsabha: पाथरी विधानसभा मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला असून आमदार राजेश विटेकर किंवा त्यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाबाई विटेकर उमेदवार होऊ शकतात.
भारतीय जनता पक्षाचा हक्काचा पाथरी मतदार संघ यंदा शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. माजी आमदार मोहन फड आजारी असल्याने व भाजपाकडून सक्षम उमेदवार समोर न असल्याने हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला सुटेल असे बोलले जात होते.