Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

विधानसभेची निवडणूक दोन पक्षासह तीन अपक्षात झाली असून, जातीय मतांचे ध्रुवीकरण मोठ्याप्रमाणात झाले असल्याने विजयाचे गणित लावताना सर्वांची दमछाक होत आहे.
Ramesh Adaskar, Prakash Solanke and Mohan jagtap
Ramesh Adaskar, Prakash Solanke and Mohan jagtapsakal
Updated on

माजलगाव - विधानसभेची निवडणूक दोन पक्षासह तीन अपक्षात झाली असून, जातीय मतांचे ध्रुवीकरण मोठ्याप्रमाणात झाले असल्याने विजयाचे गणित लावताना सर्वांची दमछाक होत आहे. अंतिम टप्यात अपक्ष उमेदवार रमेश आडसकरांनी बाजी मारल्याचे दिसत असले तरी, प्रतिस्पर्धी अनुभवी प्रकाश सोळंके डोईजड ठरू शकतात तर, मुस्लीम, दलित मतांवर जगतापांची मदार आहे. दोन ओबीसी अपक्ष उमेदवारामुळे मराठा, दलित, मुस्लीम मतांचा अधिकचा टक्का ज्यांच्या पारड्यात पडेल तो विजश्री खेचून आणण्यात यशस्वी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.