खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

एका खून प्रकरणात शिक्षा भोगुनही पुन्हा केला होता खुनाचा प्रयत्न !
murder
murdermurder
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : खुन प्रकरणात शिक्षा भोगत असताना पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सुपतगांव (ता. उमरगा) येथील एका व्यक्तीला शुक्रवारी (ता. सात) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील सुपतगांव (Umarga) येथे पाच जुलै २०१३ रोजी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास पंचप्पा लक्ष्मण लामजणे हा गावातील हनुमान मंदिरासमोर त्याचा भाऊ महादेव तसेच गावातील सिध्देश्वर लोखंडे, कलप्पा बिराजदार, बबुवान हेंडले  इतर लोकांसमवेत गप्पा मारीत बसलेले होते. या दरम्यान अचानक भावकीतील खून प्रकरणात शिक्षा भोगुन आलेला भिमाशंकर शिवप्पा लामजणे हा तेथे हातात कुऱ्हाड घेऊन आला. आणि पंचाप्पाचा भाऊ महादेव याला शिवीगाळ करू लागला.(man get life imprisonment for attempted Killing In umarga taluka of osmanabad)

murder
देशसेवा करुन परतणाऱ्या जवानास ग्रामस्थांनी ठोकला कडक सॅल्यूट

आणि म्हणाला की, मी तुरुंगात असताना तुझा मित्र संतोष मारुती लामजणे याने माझ्या पत्नीशी संबंध ठेवले, त्यांच्या सोबत तु फिरत होता. या कारणावरून भिमाशंकरने महादेवच्या डोक्यात डोक्यात ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यावेळी सिध्देश्वर लोखंडे यांने भिमाशंकरच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली. भिमशंकरने केलेल्या मारहाणीत (Osmanabad) महादेव लामजणे याच्या डोक्यात व पायावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. तेव्हा प्रारंभी उमरगा व नंतर सोलापूरला उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी महादेवचा भाऊ पंचप्पा याने दिलेल्या फिर्यादीवरून भिमाशंकर लामजण यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शासनातर्फे एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पंचाप्पा, जखमी महादेव लामजणे, पंच दत्ता कांबळे, तपासणी अधिकारी डी. पी. पवार, विलास गोबाडे तसेच डॉ. ए. व्ही. प्रसन्ना यांची साक्ष व इतराच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या.

murder
पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी भाजपकडून महामृत्यूंजय मंत्रजाप

दरम्यान आरोपी भिमाशंकर याच्याविरुद्ध उस्मानाबाद येथील सत्र न्यायधीश यांच्यापुढे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली नक्कल सादर करण्यात आली. न्यायालयापुढे आलेला पुरावा तसेच अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. संदिप देशपांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. अनभुले यांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी भिमाशंकर लामजणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.