आडुळ - दोन दिवसांपासून कडेठाण सह परिसरात जोरदार मुसळधार पडत असल्याने परिसरातील नदी-नाले तुंडब भरून वाहू लागल्याने पुर सदृष्य परिस्थिती निर्माण होवुन येथील मांजरदरा तलाव तुडुंब भरला खरा माञ पावसाचा जोर जास्त असल्याने या तलावाची भिंतीला तडे जावुन हि भिंत मधोमध फुटल्याने तलावातील लाखो लिटर पाणी वाया गेले तर या पाण्यामुळे तलावाखाली असलेल्या गेवाराई मर्दा व कडेठाण येथील शेकडो शेतकऱ्यांची पिके व शेतातील माती पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.