Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा समाजबांधवांना केलं आवाहन म्हणाले, 'मराठा जात संकटात, मी एकटा पडलोय; 6 तारखेपर्यंत...'

Manoj Jarange Patil: मी एकटा पडलो आहे आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे. आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे, म्हणत जरांगेंनी समाजबांधवांना साद घातली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilEsakal

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एकिकडे मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी करत आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी केलीय. हा मुद्दा पेटलेला असतानाच मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकजुट होण्यासाठी साद घातली आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिलेत. त्यामुळं मी एकटा पडलो आहे आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे. आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. त्यासाठी 6 जुलैपासून सुरु होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

Manoj Jarange Patil
Sanjay Ruat: "आम्ही जो आरपार घातलाय..."; एकनाथ शिंदेंच्या 'बांबू' वक्तव्यावर ठाकरे गटाचे शिवराळ प्रत्युत्तर

मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती सगळ्यांना वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे. मी एकटा पडलो आहे. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडं पाडलं आहे. विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. पण मराठा समाजाने एकजूट राहावे, ही माझी विनंती आहे, असंही जरांगे पुढे म्हणालेत.

Manoj Jarange Patil
Video: प्रशांत किशोर यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनी बिहारींना...खान सरांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, मराठा जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आवाहन आहे, त्यांनी 6 ते 13 जुलैपर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आपल्या डोळ्यांदेखत लेकरांचं वाटोळं होऊन देऊ नका. 6 तारखेपर्यंत मराठ्यांनी आपली सर्व कामं उरकून घ्यावी.

6 जुलैला एकाही मराठ्याने घरात न राहता शांतता जनजागृती रॅलीला उपस्थित राहावं. कोणीही गावाच्या बाहेर किंवा लग्नकार्याला जाऊ नका. प्रत्येक जिल्ह्यातील जनजागृती रॅलीला ताकदीने प्रतिसाद द्या. आपल्याला घेरलं गेलंय, आपली जात संकटात सापडली आहे. मी एकटा पडलोय, पण मी मागे हटत नाही. मी मेलो तरी हरकत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देईन, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil
Builder Association Protest : ‘बांधकाम’कडे साडेपाच हजार कोटी थकीत; गुरुवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com