Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू; संभाजीनगरमधील डॉक्टरांचं पथक पोहचलं आंतरवाली सराटीला

Manoj Jarange Patil : जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले. रात्री दहा आणि दीड वाजता जरांगे यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Esakal
Updated on

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने रात्री त्यांच्यावर आंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू करण्यात आले. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत पोहचले. जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले. रात्री दहा आणि दीड वाजता जरांगे यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मनोज जरांगे यांना शुक्रवारी मध्यरात्री तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांच्यावर अंतरवाली सराटी येथे वैद्यकिय उपचार करण्यात आले आज सकाळी शनिवार ता.02 रोजी त्यांची तब्येत सुधारली असून ते या ठिकाणी आलेल्या नागरीकांची भेट घेत आहे.

या ठिकाणी शुक्रवार ता.1 रोजी मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी अंतरवाली सराटी येथे आले होते ,या ठिकाणी दिवसभर त्यांनी नागरीकाबरोबर संवाद साधला , रात्री त्यांना छातीत दुखु लागले ,अशक्तपणा जाणवला होता वडीगोद्री येथील खाजगी डॉक्टर राजेंद्र तारख यांनी त्यांच्यावर उपचार केले त्या नंतर मध्यरात्री छत्रपती येथील खाजगी डॉक्टर चावरे , डॉक्टर रमेश तारख यांनी व पथकांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांची तपासणी केली जरांगे यांची तब्येत सध्या चांगली असून ते अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी आहेत.

Manoj Jarange Patil
NPS: मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा! सुधारीत 'NPS' योजना शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करणार

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना शुक्रवारी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता. दरम्यान, डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीला पोहचले. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रात्रीच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने आणि त्रास अधिक वाढल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संभाजीनगरच्या डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली.

Manoj Jarange Patil
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीसह गारपीटीचा तडाखा; 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

त्यामुळे संभाजीनगरच्या डॉक्टरांचं पथक आंतरवालीत पोहचलं आणि जरांगे यांची तपासणी करण्यात आली. रात्री दहा वाजता पहिला इसीजी काढण्यात आला, त्यामध्ये कोणताही धोका नसल्याचे समोर आलं. त्यानंतर देखील डॉक्टरांचं पथक तिथेच थांबून होतं. रात्री दीड वाजता पुन्हा दुसरा इसीजी काढण्यात आला आणि त्यात देखील कोणताही धोका नसल्याचे समोर आले. आता जरांगे यांची तब्येत स्थिर आहे.

बातमीदार - दिलीप दखने

Manoj Jarange Patil
औज बंधाऱ्यात १३ दिवस पुरेल इतकेच पाणी! उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी; १० मार्चनंतर धरणातून सुटणार पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()