Manoj Jarange : 'शिंदे-शरद पवारांमध्ये काय चर्चा झाली माहित नाही, पण आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही'

Maratha Reservation antarwali sarati andolan : जरांगे यांची तब्येत खालावली आहे. उपचार घेण्यासाठी त्यांनी नकार दिला आहे.
Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange Maratha Reservationesakal
Updated on
Summary

''मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांची आरक्षणाबाबत काय चर्चा झाली हे माहित नाही.''

वडीगोद्री : त्यांनी तिकडून बोलायचे, मी इकडून बोलायचे.. मराठा आरक्षण हा लहान विषय नाही. मीडियाव्दारे बोलून प्रश्न सुटणार नाही. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी येथे येऊन भूमिका स्पष्ट करावी, सापडलेल्या नोंदीच्या आधारे वेळेत प्रमाणपत्र द्यावे, तिन्ही गॅजेट्स लागू करावे, आरक्षणाचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिला.

मनोज जरांगे आपले पाचवे उपोषण अंतरवाली सराटी (Maratha Reservation) येथे करत असून उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे यांची तब्येत खालावली आहे. उपचार घेण्यासाठी त्यांनी नकार दिला आहे. या वेळी बोलताना जरांगे यांनी सांगितले, की माझ्यावर जे टीका करतात त्यांना उपोषण संपल्यावर उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांची आरक्षणाबाबत काय चर्चा झाली हे माहित नाही.

Manoj Jarange Maratha Reservation
Prithviraj Chavan : 'या' पालकमंत्र्यांविरोधात महाविकास आघाडी तगडा उमेदवार देणार; पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा

सरकारला वेळ दिला, मुदत दिली. आता अंतरवाली सराटीला कोण मंत्री पाठवावा, असा प्रश्न सरकारला पडला आहे. आमचे उपोषण सुरु आहे. सरकारला इकडे येऊन काय बोलावे, असा प्रश्न पडला आहे. शासनाने ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्या आधारे उशिर न करता त्यांना प्रमाणपत्र वाटप करावे, असेही जरांगे यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या विद्यार्थांना प्रमाणपत्र व्हॅलिडीटीसाठी अडचणी येत होत्या, याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारने सहा महिन्याची मुदत वाढ दिली, मी त्यांचं कौतुक करत आहे. सरकारनं चांगला निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे हे आरक्षण देऊ शकतात, त्यांनी लवकर आरक्षण द्यावे. आमचे हाल करू नये.

-मनोज जरांगे, मराठा आंदोलक,अंतरवाली सराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.