मनोज जरांगेंची आज बीडमध्ये 'निर्णायक इशारा' सभा; प्रचंड गर्दीची शक्यता, शाळा बंद, प्रशासन सज्ज

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार आहे. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटल २४ डिसेंबरला संपणार आहे.
manoj jarange patil maratha reservation andolan important rally in beed
manoj jarange patil maratha reservation andolan important rally in beed
Updated on

बीड- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार आहे. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटल २४ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे जरांगे आज बीडच्या सभेत काय निर्णय घेतात किंवा सरकारला इशारा देतात याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

बीडमध्ये सभेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झालं आहे. (manoj jarange patil maratha reservation andolan important rally in beed before ultimatum )

मनोज जरांगे पाटील शुक्रवारी रात्री बीडमध्ये पोहोचले आहेत. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ते सभेकडे रवाना होतील. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करतील. दुपारी दोन वाजता ते सभेठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे.

manoj jarange patil maratha reservation andolan important rally in beed
Chhagan Bhujbal : 'व्याही, पत्नीचे आई-वडील यांनाही आरक्षण दिलं पाहिजे...'; मनोज जरांगेंवर भुजबळांची उपरोधक टीका

शाळा बंद राहणार?

मागे मराठ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. अनेकांना नोटिसी पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासन सज्ज झालं असून आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. माहितीनुसार, शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर शिक्षण अधिकारी नोट रिचेबल आहेत. सभेसाठी पाच लाखांचा जमाव येण्याची शक्यता आहे.

manoj jarange patil maratha reservation andolan important rally in beed
Maratha Reservation: 'आईला आरक्षण पण मुलाला नाही ही मोठी शोकांतिका...', सर्व सोयऱ्यांना आरक्षण देण्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

पुढची दिशा ठरणार?

जरांगे पाटील आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची शक्यता आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या जरांगेंची चर्चा निष्फळ ठरली. सगे-सोयरे कोण? यावरुन सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मतभेद कायम आहेत. सरकारकडून अद्याप ठोस असं जरांगेंना कळवण्यात आलं नाही. त्यामुळे किमान आज तरी सरकारकडून त्यांना काही निर्णायक कळवण्यात येतं का हे पाहावं लागणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()