जातेगाव- विधानसभा अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील आक्रमक होत असून, मराठा आरक्षण पाहीजेच शिवाय शेतकरी कर्जमाफीचा देखील नारा त्यांनी सुरु केला आहे.याबाबत त्यांनी राज्यभर घोंगडी बैठकी घेण्यात येणार असून त्यांच्या पहिल्या बैठकीचा श्रीगणेशा सप्टेंबरच्या पाच तारखेला बीडच्या पंडित,पवार यांच्या गेवराईतून होणार आहे.